मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांचा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित सिनेमा ‘2.0’ आज प्रदर्शित झाला आहे. रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या जगभरातील चाहत्यांना या सिनेमाची प्रतिक्षा होती. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांमधील उत्साह शिगेला पोहोचलेला होता. या सिनेमाच्या ट्रेलरला आतापर्यंत 38 मिलीअनहून अधिक व्ह्यू मिळाले आहेत, तर याचा टिझर 45 मिलीअनहून अधिक लोकांनी बघितला. तसेच या मेगा बजट सिनेमाने बाहुबली-2चा रेकॉर्ड तोडला आहे. स्क्रीन ऑक्यूपेंसीच्या बाबतीत 2.0 ने बाहुबली-2ला मागे सोडले आहे. 2.0ला भारतात तब्बल 6600-6800 स्क्रीनवर रिलीज करण्यात येणार आहे. बाहुबली-2ला 6500 स्क्रीनवर रिलीज करण्यात आले होते.
2.0 हा सिनेमा आज प्रदर्शित झाला, वडाळ्याच्या आयमॅक्स या चित्रपटगृहात साकाळी 7 ला याचा पहिला शो होता. तर माटुंग्याच्या अरोडा चित्रपटगृहात सकाळी 6 वाजता या सिनेमाचा पहिला शो होता. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच येथे चाहत्यांची गर्दी बघायला मिळाली.
रजनीकांतचा सिनेमा त्यांच्या चाहत्यांसाठी कुठल्या उत्सवापेक्षा कमी नसतो. त्याचे तमाम चाहते त्याच्या या सिनेमासाठी अतिशय उत्सुक आहेत. त्याच्या प्रत्येक सिनेमाचे स्वागत अतिशय उत्साहात केले जाते. यावेळीही अशीच तयारी करण्यात आली आहे. आजही रजनीकांतच्या चाहत्यांनी त्याच्या 2.0 सिनेमाच्या स्वागताची भव्य तयारी केली.
2.0 हा सिनेमा रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सपडला होता. टेलिकॉम कंपन्यांची संघटना ‘सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने ‘2.0’ मधील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला होता. या संघटनेने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला एक पत्र पाठवल, यात या सिनेमात मोबाईलचा वापर आणि मोबाईल टॉवर याविषयी जास्तीत जास्त नकारात्मक बाबी दाखवल्या गेल्या आहेत असं या तक्रार पत्रात म्हटले गेले. तसेच काही दिवसांपूर्वी 2.0च्या ट्रेलरमध्ये खलनायकाची भूमिका साकारलेला अक्षय कुमार मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणाऱ्या परिणाविषयी बोलत आहे. या दृश्यावर सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने आक्षेप घेतला आहे. मोबाईल आणि मोबाईल टॉवरमुळे होणारे दृष्परिणाम अधिक वाढवून सांगितले आहे, जे चुकीचं आहे. जोपर्यंत चित्रपट निर्माते या दृश्याविषयी समाधानकारक उत्तर देत नाहीत तोपर्यंत सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने केली होती.
हा चित्रपट सर्व रेकॉर्ड तोडणार असा अंदाज वर्तवला जात आहे. फिल्म ट्रेड एक्सपर्टच्या मते, हा सिनेमा पहिल्याच दिवशी ठग्स ऑफ हिंदोस्तानचा रेकॉर्ड तोडू शकतो. आमीर खानच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानने पहिल्याच दिवशी 50 कोटीहून जास्त कामाई केली. त्यामुळे तो पहिल्या दिलशी सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरला. आता 2.0 हा रेकॉर्ड तोडू शकतो.