मुंबई : लोकप्रिय वेबसिरीज ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. एकीकडे या वेब सीरीजची लोकप्रियता वाढत असताना, दुसरीकडे ‘मिर्झापूर’वर बंदीची घालण्याची मागणी (Mirzapur Controversy) केली जात आहे.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आता कॉमेडियन आणि यूपी फिल्म विकास परिषदेचे अध्यक्ष राजू श्रीवास्तव यांनीदेखील मिर्झापूर या वेब सिरीजवर टीका केली आहे. (Raju Srivastav says Mirzapur 2 is full of vulgarity and violence; Demand for sensors on OTT)
राजू श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, मिर्झापूर 2 ही वेबसिरीज अश्लीलतेने आणि हिंसेने भरलेली आहे. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे. तसेच श्वीवास्तव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, डिजीटल प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) प्रदर्शित होणारा कंटेंट सेन्सॉरद्वारे प्रदर्शित केला जावा.
‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी, खासदार अनुप्रिया पटेल यांचे पंतप्रधानांना साकडे!
‘मिर्झापूर’ वेब सीरीजमधून ‘मिर्झापूर’ची बदनामी केली जात असल्याचा आरोप मिर्झापूच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी केला आहे. त्यांनी या सिरीजवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
माननीय प्रधानमंत्री @narendramodi जी एवं माननीय मुख्यमंत्री @myogiadityanath जी के नेतृत्व में मिर्ज़ापुर विकासरत है।यह समरसता का केंद्र है। मिर्ज़ापुर नामक Webseries के ज़रिए इसे हिंसक इलाक़ा बताकर बदनाम किया जा रहा है।इस सीरीज़ के माध्यम से जातीय वैमनस्य भी फैलाया जा रहा है।1/2
— Anupriya Patel (@AnupriyaSPatel) October 24, 2020
हिंसक प्रदेश म्हणत बदनामी केल्याचा दावा
अनुप्रिया पटेल यांनी ट्विट करत लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वात ‘मिर्झापूर’ विकसित होत आहे. इथे लोकांमध्ये छान सुसंवाद आहे. मात्र, ‘मिर्झापूर’ नावाच्या वेब सीरिजद्वारे याची हिंसक क्षेत्र म्हणून बदनामी केली जात आहे. या मालिकेतून जातीय वैमनस्य पसरवले जात आहे. ‘मिर्झापूर’ जिल्ह्याची खासदार या नात्याने या सगळ्याबाबत चौकशी झाली पाहिजे आणि त्याविरोधात कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.
मिर्ज़ापुर ज़िले की सांसद होने के नाते मेरी माँग है कि इसकी जाँच होनी चाहिए और इसके विरुद्ध कार्यवाही होनी चाहिए @PrakashJavdekar @narendramodi @myogiadityanath
2/2— Anupriya Patel (@AnupriyaSPatel) October 24, 2020
गुरमीत सिंह आणि मिहीर देसाई यांच्या दिग्दर्शनात बनलेली ही वेबसिरीज 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात आली आहे. यामधील पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे. कथेत रंजकता आणण्यासाठी यावेळच्या दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकारदेखील दिसले आहेत. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले आहेत. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या
Mirzapur 2 | ‘नेताजी बनना है तो गुंडे पालो, गुंडे मत बनो’, सोशल मीडियावर ‘मिर्झापूर 2’ची हवा!
Disha Salian | दिशाच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली!
Payal Ghosh | रामदास आठवलेंचा पाठिंबा, अभिनेत्री पायल घोषच्या हाती ‘आरपीआय’चा झेंडा!
(Raju Srivastav says Mirzapur 2 is full of vulgarity and violence; Demand for sensors on OTT)