अयोध्या : राम मंदिर उभारणीसाठी महाराष्ट्रातूनही मदतीचा ओघ सुरु आहे. त्यातच आता स्वतः राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी महाराष्ट्रातून 1 कोटी रुपये आल्याचं सांगितलं आहे (Ram Mandir Trust Champat Rai on 1 Crore donation). तसेच हे एक कोटी रुपये कुणी दिले हे माहिती नाही, मात्र, त्यावर शिवसेना असं लिहिलं असल्याचंही चंपतराय यांनी नमूद केलं. ते राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
चंपतराय म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 3 कोटी रुपयांची घोषणा केली होती. नुकतेच राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटी रुपये आले आहेत. हे पैसे नक्की कुणी पाठवले हे माहिती नाही. मात्र, जी पोहच आली आहे त्यावर शिवसेना असे लिहिले आहे.”
दरम्यान, याआधी राम मंदिर ट्रस्ट निर्मितीचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी शिवसेनेने राम मंदिरासाठी एकही रुपया दिला नसल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, “उद्धव ठाकरेंनी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या देणगीची घोषणा केली होती. मात्र यातील एकही रुपया अद्याप ट्रस्टला मिळालेला नाही. हे एक कोटी नेमके कुठे गेले असा प्रश्न उपस्थितीत होत आहेत.”
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
गोपालदास यांच्या या दाव्यानंतर शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी हा दावा खोडून काढत 1 कोटी रुपये दिल्याचं स्पष्ट करत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओत अनिल देसाई यांनी 1 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती दिली. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याच्या वेळी राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी देऊ असे जाहीर केले होते. त्यानुसार, उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी शिवसेनेतर्फे राम मंदिर उभारणीसाठी 1 कोटींचा निधी स्टेट बँकेत जमा केला आहे. त्याबाबत अनिल मिश्रा आणि खजिनदार चंपकलाल यांनीही ते पैसे मिळाल्याची पोचपावती दिली.”
“आम्ही 70 एकर जागेवर विकास करणार आहोत. त्याचा नकाशा तयार करुन विकास प्राधिकरणाकडे पाठवला आहे. तो नकाशा लवकरात लवकर पास करा, अशी मागणी केलीय. त्याची जवळपास 2 कोटी रुपये फी आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही अयोध्येत वास्तव्यास असलेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येकाच्या परिवारातील एका सदस्याला या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलंय. त्या व्यतिरिक्त काही कारसेवकांच्या परिवाराला आमंत्रण दिलं आहे,” अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी दिली.
हेही वाचा :
मोदी आणि योगींसह केवळ 5 जण मंचावर, अयोध्येतील भूमिपूजनाचा नेमका ‘प्लॅन’ कसा?
रामाच्या फोटोमध्ये मिशा हव्या, लफडेबाजीने सुशांतने आत्महत्या केली असावी : संभाजी भिडे
Ram Mandir Trust Champat Rai on 1 Crore donation