त्यामुळे या आधी तुम्ही कधीही पहिली नसतील अशी दृश्य यावेळी पाहायला मिळत आहेत.
-
-
पुण्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं खडकवासला धरण.
-
-
हे पुण्याची तहान भागवणारं मुख्य आणि महत्वाचं धरण आहे.
-
-
याच खडकवासला धरणाचे ड्रोन कॅमेऱ्याने विहंगम आणि मनमोहक दृश्य टिपली आहेत.
-
-
खडकवासला धरणातून सध्या 9 हजार क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे.
-
-
त्यामुळे धरणाचे सर्व दरवाजे उघडले आहेत.
-
-
त्यामुळे या आधी तुम्ही कधीही पहिली नसतील अशी दृश्य यावेळी पाहायला मिळत आहेत.
-
-
एकीकडे पूर्णपणे काठोकाठ भरलेलं धरण दिसत आहे.
-
-
तर दुसऱ्या बाजूने पाण्याचा मोठा विसर्ग दिसत आहे.
-
-
विशेष म्हणजे या ड्रोन कॅमऱ्यात टिपलेल्या दृश्यात एकाचवेळी धरणाचा प्रवाह आणि पुण्याचं रुप पाहायला मिळतंय.
-
-
धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने खळखळणारा प्रवाह वेगाने पुण्याकडे जाताना पाहायला मिळत आहे.
-
-
धरण परिसरातील पूलही यात विशेष लक्ष वेधून घेतो आहे.
-
-
एकूणच पुणेकरांना सध्या खडकवासला धरणाचं दुर्मिळ रुप पाहायला मिळत आहे.
Beautiful photos of Pune Khadakwasla Dam