रत्नागिरी : रॉट व्हिलर जातीच्या पाळीव कुत्र्याच्या हल्ल्यात 55 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत कामगाराचं नाव दिवाकर पाटील आहे. रत्नागिरी शहरात हा प्रकार घडला. खायला अन्न देण्यासाठी गेले असताना रॉट व्हिलर (rottweiler) या जातीच्या कुत्र्याने हा हल्ला केला. हल्ल्यादरम्यान कुत्रा एवढा चवताळलेला होता, की त्याला बेशुद्ध करुन दिवाकर यांची सुटका करावी लागली. पण दुर्देैवाने त्यांचा मृत्यू झाला. (man died in attack of rottweiler pet dog)
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात माजी उपनगराध्यक्ष बाळ मयेकर यांनी रॉट व्हिलर जातीचा कुत्रा पाळलेला आहे. दिवाकर पाटील या कुत्र्याला जेवण द्यायला गेले. मात्र कुत्रा आधीच चवताळलेला असल्याने दिवाकर यांच्यावर कुत्र्याने जोरदार हल्ला केला. हा हल्ला एवढा भीषण होता, की दिवाकर गंभीर जखमी झाले.
रॉल्ट व्हिलर जातीच्या या कुत्र्याचा हल्ला अतिशय भीषण स्वरुपाचा होता. दिवाकर पाटील कुत्र्याच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले. ही माहिती समजातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी कुत्र्याच्या तावडीतून दिवाकर यांची सुटका करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला. मात्र, कुत्रा एवढा चवताळलेला होता, की दिवाकर यांची सुटका करण्यासाठी थेट डॉक्टर आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवावे लागले. त्यानंतर कुत्र्याला बेशुद्ध करुनच कामगार दिवाकर यांची सुटका करावी लागली. मात्र, दिवाकर पाटील यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पोसिसांनी सुरु केला आहे.
संबंधित बातमी :
Corona | कोरोनाची धास्ती! मुंबईत कुत्राही 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये
बकरी आणि कुत्रा महापौरपदाच्या निवडणूक रिंगणात
कुत्रा चावल्याने म्हशीचा मृत्यू, दूध प्यायलेले 200 जण रुग्णालयात
(man died in attack of rottweiler pet dog)