रत्नागिरीतील शेतकऱ्याची कमाल, शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भात झोडणीच्या यंत्राची निर्मिती

| Updated on: Nov 16, 2020 | 3:17 PM

शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भात झोडणीचे यंत्र तयार केले आहे.(Ratnagiri Farmer Rice threshing create machine From waste out of best)

रत्नागिरीतील शेतकऱ्याची कमाल, शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भात झोडणीच्या यंत्राची निर्मिती
Follow us on

रत्नागिरी : कोरोना काळात अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र वाढती मजुरी त्याचबरोबर मजुरांचा तुटवडा यामुळे अशा शेतीसाठी होणार खर्च कमी करण्यासाठी रत्नागिरीतील शेतकऱ्याने नवी युक्ती शोधून काढली आहे. शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून भात झोडणीचे यंत्र तयार केले आहे.(Ratnagiri Farmer Rice threshing create machine From waste out of best)

भात झोडणी सुलभ व्हावी यासाठी बाजारात 18 हजारापासून कंपन्यांचे भात झोडणी यंत्र विकत मिळते. रत्नागिरीत अनेक ठिकाणी वर्षांतून एकदाच भात पीक घेतलं जाते. त्यामुळे ते यंत्र पुढील 7-8 महिने तसेच पडून राहते. यामुळे कित्येकदा ते खराबही होते. यावर उपाय म्हणून रत्नागिरी सोमेश्वर येथील एका शेतकऱ्याने घरीच भात झोडणी मशीन बनवली आहे.

त्यासाठी त्यांनी घरातील टाकाऊ पत्रा, फळ्या, लोखंडी रॉड एकत्र केले. लोखंडी स्टँडवर बॅरलसारख्या दोन फळ्या जोडल्या. त्यानंत झोडणीसाठी बॅरलच्या मध्ये शाफ्टला लाकडाच्या चौकोन जोडला. हा शाफ्ट फिरला की लाकडाच्या चोकोनी भाग भाताच्या पेंडीवर आपटून ते झोडले जाते. त्यानंतर वरच्या बाजूला पत्रा लावून तो भाग बंद केला आहे बॅरलच्या समोरच्या बाजूला पेंडी जाईल एवढी मोकळी जागा ठेवली त्याला एक एचपीची मोटार बसवून विजेवर ते झोडणी यंत्र चालवणे सोपे जाते.

हा झोडलेला सर्व भात एकत्रित करण्यासाठी खालील बाजूला पत्रा जोडला आहे त्यावर भात पडून ते मोकळ्या जागेवर गोळा होतो. हा पेंढीचा तूस किंवा गवताचे तुकडे शाफ्टच्या वाऱ्याने बाजूला पडतो. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षे ते हे मशीन चालवत आहे. त्याला दुरुस्तीसाठी एकही रुपया खर्च आला नाही. मोटारसाठी आलेला सहा हजार रुपये खर्च वगळता अन्य काही एक पैसा लागलेला नाही. या कामासाठी त्यांनी जवळचे इलेक्ट्रीशियन मित्र याची मदत घेतली आहे. (Ratnagiri Farmer Rice threshing create machine From waste out of best)

संबंधित बातम्या : 

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हॉटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषिमंत्री दादाजी भुसे

बळीराजावर अवकळा, अतिवृष्टीमुळे 10 एकर सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ