रत्नागिरी : ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर घोंगावत असतानाच रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु होती. अखेर काही वेळाने हे जहाज पंधरा माड परिसरात संरक्षक भिंतीवर येऊन थडकले. (Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)
‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासूनच कोणालाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला होता. रत्नागिरीत सध्या एनडीआरएफच्या दोन टीम दाखल आहेत. मात्र मिऱ्या समुद्रावर अजस्त्र लाटा उसळलेल्या असताना जहाज भरकटल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र प्रशासनाला त्यात यश आले नव्हते. जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
UPDATE | रत्नागिरी : मिऱ्या समुद्र किनारी भरकटलेले जहाज पंधरा माड परिसरात संरक्षक भिंतीवर येऊन थडकले, जहाजावर अडकलेल्या खलाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु pic.twitter.com/cu2OBuYn52
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
(Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)
रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये जहाज भरकटले, जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न असफल, जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती, समुद्राच्या अजस्त्र लाटांशी जहाजाची झुंज सुरु #CycloneNisarga #NisargaCyclone #CycloneUpdate #Ratnagiri pic.twitter.com/UfB9LgUFhs
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2020
रत्नागिरीतील देवरुखमध्ये पाऊस आणि वाऱ्याने जोर धरला आहे. देवरुखमधील भंडारवाडीत झाड कोसळून घराचं नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टीपासून 50 किमी दूर असलेल्या देवरुखलाही जाणवला.
‘निसर्ग’ चक्रीवादळाचे ताजे अपडेट इथे वाचा : CYCLONE NISARGA LIVE UPDATE
परिसरात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु होता. सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने जोर धरला. पावसासोबत वाराही वेगाने वाहत होता. शहरातील भंडारवाडी येथे वाऱ्याने एक वृक्ष मूळासकट उन्मळून पडला. यामुळे घरांचे नुकसान झाले.
कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला चक्रीवादळ धडकण्याचा अंदाज आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव आज (बुधवार 3 जून) आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. (Ratnagiri Ship Stuck in Mirya Sea)