एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

| Updated on: Nov 09, 2020 | 10:41 AM

प्रलंबित वेतनासाठी आज 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे.  (Ratnagiri ST Worker Committed Suicide for pending salary)

एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; वेतन थकल्यामुळे रत्नागिरीत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
Follow us on

रत्नागिरी : रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळला आहे. या एसटी चालकाने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पांडुरंग गडदे असे या कर्मचाऱ्याचं नाव आहे. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. तसेच प्रलंबित वेतनासाठी आज 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे.  (Ratnagiri ST Worker Committed Suicide for pending salary)

गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. त्यामुळे पगार वेळेवर होत नसल्याने या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. नुकतंच त्याचा मृतदेह भाड्याच्या राहत्या घरी आढळला आहे.

आत्महत्या केलेला हा एसटी चालक मूळ बीडमधील राहणारा आहे. या चालकाला काम केलेल्या दिवसापर्यंतचा पगार देण्यात आलेला आहे, असा दावा एसटीकडून केला जात आहे. दरम्यान जर आज पगार दिला नाही, तर कर्मचारी आक्रोश आंदोलन करणार आहेत.

दरम्यान ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेल्या एसटी सेवेतील कर्मचारी दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचे अस्त्र उपसण्याच्या तयारीत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. त्यासाठी राज्यातील एसटी कामगार पुन्हा एकदा आक्रोश करणार आहेत. प्रलंबित वेतनासाठी 9 नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करतील.

दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.(Ratnagiri ST Worker Committed Suicide for pending salary)

संबंधित बातम्या : 

एसटी कर्मचाऱ्यांचा दोन महिन्यांचा पगार थकला; दिवाळीच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, परिवहन मंत्र्यांची घोषणा