Ratris Khel Chale 2 | अण्णा नाईकांची शेवंताशी लगीनगाठ, नाईक वाड्यावर खळबळ

| Updated on: Jul 21, 2020 | 5:44 PM

एकीकडे माईने वाड्यावर हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केला आहे, त्याच वेळी हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहिली

Ratris Khel Chale 2 | अण्णा नाईकांची शेवंताशी लगीनगाठ, नाईक वाड्यावर खळबळ
Follow us on

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘रात्रीस खेळ चाले 2’ उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. क्रूरकर्मा अण्णा नाईक लवकरच सौंदर्यवती शेवंतासोबत लगीनगाठ बांधणार आहेत. त्यामुळे नाईक वाड्यावर एकच खळबळ उडाली आहे. (Ratris Khel Chale 2 Serial Written Update Anna Naik to marry Shevanta)

अण्णा नाईकांशी लग्न करुन शेवंता आता नाईक वाड्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. मात्र शेवंता आता नाईक वाड्यात प्रवेश करणार का, की अण्णा नाईक केवळ तिला झुलवत ठेवणार, माई नेमका काय पवित्रा घेणार, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पाटणकर बाई अर्थात शेवंताची भूमिका साकारत आहे, तर दिग्गज अभिनेते माधव अभ्यंकर अण्णा नाईक यांच्या भूमिकेत आहेत. शकुंतला नरे सोशिक माईची व्यक्तिरेखा साकारतात.

आजच्या भागात काय?

एकीकडे माईने वाड्यावर हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित केला आहे, त्याच वेळी हिरवा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र घालून शेवंता दारात उभी राहिली. हे पाहून माईसह दत्ता, सरिता, छाया अशा नाईक कुटुंबातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यापुढे काय होणार याची उत्सुकता कायम आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

‘रात्रीस खेळ चाले’च्या दुसऱ्या पर्वाचे नवीन भाग सोमवारपासूनच सुरु झाले. त्यामुळे साडेतीन महिन्यांनी शेवंता-अण्णा नाईक यांची केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. गूढ, रहस्य, ट्विस्ट, प्रेम, अंधश्रद्धा, भूत आणि क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या घडामोडींमुळे ही मालिका दिवसेंदिवस चाहत्यांची वाहवा मिळवत आहे. (Ratris Khel Chale 2 Serial Written Update Anna Naik to marry Shevanta)

हेही वाचा : “अण्णा… तुम्ही, आता…?”, शेवंताची हटके मुलाखत

(Ratris Khel Chale 2 Serial Written Update Anna Naik to marry Shevanta)