गरीब घरच्या पोराने बहीण पळवल्याचा राग, बीडमधील ऑनर किलिंगमागचं वास्तव

| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

बीड : बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध होता म्हणून भावाने मेहुण्याची भररस्त्यात हत्या केली. बीडमधील ऑनर किलिंगच्या या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. हत्या झालेल्या सुमित वाघमारेवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमितला अंतिम निरोप देताना अख्ख कुटुंब सुन्न झालेलं होतं. त्याच्या मारेकऱ्यांना आता अटक करून फाशी देण्याची मागणी सुमितच्या कुटुंबीयांची आहे. सुमित आणि […]

गरीब घरच्या पोराने बहीण पळवल्याचा राग, बीडमधील ऑनर किलिंगमागचं वास्तव
Follow us on

बीड : बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध होता म्हणून भावाने मेहुण्याची भररस्त्यात हत्या केली. बीडमधील ऑनर किलिंगच्या या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. हत्या झालेल्या सुमित वाघमारेवर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुमितला अंतिम निरोप देताना अख्ख कुटुंब सुन्न झालेलं होतं. त्याच्या मारेकऱ्यांना आता अटक करून फाशी देण्याची मागणी सुमितच्या कुटुंबीयांची आहे.

सुमित आणि भाग्यश्री यांच्या प्रेमाला त्यांच्याच जवळच्यांची दृष्ट लागली. भररस्त्यात भाग्यश्रीच्या भावाने आपल्या मित्राच्या सोबतीने हत्या केली. सुमित भररस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात मृत्यूशी झुंज देत होता आणि त्याची पत्नी भाग्यश्री त्याला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. मदत मिळाली, मात्र तोपर्यंत सुमितची प्राणज्योत मावळली होती. वाचा संपूर्ण घटानाक्रम : प्रेमविवाह केल्याचा राग, भावाने बहिणीसमोर तिच्या नवऱ्याला संपवलं!

सुमितच्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी सुमितच्या कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या केला. पोलिसांनी सुमितच्या कुटुंबीयांना आरोपींना अटक करण्याचं आश्वासन देत समजूत काढली. शविच्छेदन झाल्यावर सुमितचा मृतदेह गावी नेला. आरोपीला फाशीच, द्या अशी मागणी भाग्यश्रीने केली आहे.

जीवीताला धोका असल्याची तक्रार दिली, पण दुर्लक्ष

सुमित आणि भाग्यश्री यांचे दोन वर्षांपासून प्रेम जुळले. याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना झाली. त्यात सुमितच्या वडिलांनी भाग्यश्रीच्या घरी लग्नाचं निमंत्रण नेलं. मात्र हे नातं भाग्यश्रीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हतं. त्यावेळी सुमित आणि भाग्यश्रीने पळून जाऊन लग्न केलं. लग्न झाल्यावर शिवाजी नगर पोलिसात जीवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. मात्र त्याची दखल पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप सुमितच्या वडिलांनी केलाय. वाचा प्रेमविवाहाला विरोध, मुलीच्या भावाकडून तरुणाची भररस्त्यात ‘सैराट’ स्टाईल हत्या

सुमित आणि भाग्यश्रीच्या लग्नाला भाग्यश्रीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातून अनेकवेळा धमकी देखील भेटली होती. त्यामुळे पोलिसात रितसर तक्रार दिली होती. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतलं असतं तर आज घटना घडली नसती, असा आरोप सुमितच्या वडिलांनी केलाय.

आरोपी अजूनही मोकाट

सुमित-भाग्यश्री आणि भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे तिघेही एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. खरं तर भाग्यश्री आणि सुमित एकाच समाजाचे आहेत. मात्र सुमित हा गरीब घरचा होता. त्यामुळे भाग्यश्रीच्या कुटुंबीयांना ते मान्य नव्हतं. त्यामुळे या विवाहानंतर बालाजी सुमितच्या जीवावर उठला होता. वाचा माझ्या नवऱ्याला न्याय द्या, भावाला फाशी द्या, भाग्यश्रीचा टाहो ऐकून अंगावर काटा येईल

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली गाडी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हत्या होऊन इतके तास उलटलेत, मारेकरी कोण आहे हे माहिती असताना आरोपी फरार असल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. आरोपींना अटक न केल्यास पोलिसांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सुमितच्या मित्रांनी दिलाय.