‘सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा काढा’

| Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

पुणे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने नवी मागणी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या कमळातील शनिवारवाड्याचं चित्र हटवा, त्याजागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सत्यशोधक ओबीसे समाजाचे राज्य संघटक सचिन माळी यांनी ही मागणी केली. तीन वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचं नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं […]

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या बोधचिन्हातून शनिवारवाडा काढा
Follow us on

पुणे: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सत्यशोधक ओबीसी फेडरेशनने नवी मागणी केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हाच्या कमळातील शनिवारवाड्याचं चित्र हटवा, त्याजागी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा लावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सत्यशोधक ओबीसे समाजाचे राज्य संघटक सचिन माळी यांनी ही मागणी केली.

तीन वर्षापूर्वी पुणे विद्यापीठाचं नामांतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं करण्यात आलं.  या विद्यापीठाची स्थापना 1948 मध्ये झाली. त्यानंतर 1950 मध्ये या विद्यापीठाचं बोधचिन्ह तयार करण्यात आलं, त्यावेळी बोधचिन्हात शनिवारवाड्याची प्रतिमा होती. तीन वर्षांपूर्वी नाव बदललं मात्र आता बोधचिन्हातही बदल करा, अशी मागणी ओबीसी फेडरेशनने केली आहे. इतकंच नाही तर विद्यापीठ परिसरात सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या बोधचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, तसंच पुण्यातही विद्यापीठाच्या बोधचिन्हात सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा वापरावी, अशी मागणी करण्यात आली आहे.