मुंबई : Renault ची बहुप्रतिक्षित कॉम्पॅक्ट MPV Triber भारतात अखेर लाँच झाली आहे (Renault MPV Triber launched). लाँच झाल्यापासून या गाडीची खूप चर्चा आहे आणि चर्चेच कारण म्हणजे या गाडीची किंमत. कंपनीने Renault Triber या 7 सीटर गाडीची किंमत 4.95 लाख ते 6.49 लाख रुपये ठेवली आहे. Triber मध्ये 4 व्हेरिएंट (RXE, RXL, RXT आणि RXZ) उपलब्ध आहेत. यामध्ये RXE सर्वात स्वस्त आणि RXZ सर्वात महाग व्हेरिएंट आहे.
Triber RXE : हा Triber चा बेस व्हेरिएंट आहे आणि या गाडीची किंमत 4.95 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला ड्युअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस, रिअर पार्किंग सेंसर, प्रोजेक्टर हेडलाईट्स, बॉडी कलर बंपर, व्हील सेंटर कॅप, ड्युअल-टोन डॅशबोर्ड, डिजीटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फक्त समोर एसी वेंट्स, फ्रंट पावर विंडो, स्लाईड, रेक्लाईन आणि फोल्ड होणारी सेकंड-रो सीट, पावर बूट ओपनिंग, सेंटर कंसोलवर ओपन स्टोरेज आणि फ्रंटमध्ये 12V चार्जिंग सॉकेट यांसारखे फीचर्स मिळतील.
Triber RXL : या व्हेरिएंटची किंमत 5.49 लाख रुपये आहे. RXE मधील फीचर्सशिवाय या व्हेरिएंटमध्ये क्रोम फिनिश फ्रंट ग्रील, व्हील कवरसोबत 14-इंच स्टील व्हील, ब्लॅक कलरमध्ये बी आणि सी पिलर्स, टिल्ट अॅडजस्टेबल स्टिअरिंग, मॅन्युअल अॅडजस्ट होणारे विंग मिरर, सर्व सीट्ससाठी एसी वेंट्स, रिमोट सेंट्रल लॉकिंग, ब्ल्युटूथसोबतच 2-DIN ऑडियो सिस्टम, यूएसबी, 2 फ्रंट स्पीकर्स आणि सेंटर कंसोलमध्ये कूल्ड स्टोरेज यासांरखे फीचर्स मिळतील.
Triber RXT : या व्हेरिएंटची किंमत 5.99 लाख रुपये आहे. RXL मधील फिचर्ससोबतच यामध्ये रुफ रेल्स, फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, पावर अॅडजस्टेबल आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर, सर्व चार दरवाज्यांना पावर विंडो, अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि नेविगेशनसोबत 8-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4 स्पीकर्स, डे/नाईट इनसाईड रिअर व्ह्यू मिरर, दूसऱ्या लाईनमधील सीट्ससाठी 12V चं चार्जिंग सॉकेट आणि कूल्ड ग्लव्ह बॉक्स हे फीचर्स मिळतील.
Triber RXZ : हा Triber चा टॉप व्हेरिएंट आहे. याची एक्स शोरुम किंमत 6.49 लाख रुपये आहे. RXT मध्ये मिळणाऱ्या फीचर्सशिवाय यामध्ये 4 एअरबॅग्स, रिअर कॅमेरा, 14-इंचाचे अलॉय व्हील, एलईडी डीआरएल, पूश बटन स्टार्ट/स्टॉप, 2 फ्रंट ट्विटर्स, रिअर डिफॉगर, व्हायपर आणि तिसऱ्या लाईनमधील सीट्ससाठी 12V चार्जिंग सॉकेट यांसारखे फीचर्स मिळतील.
इंजिन आणि मायलेज
Renault Triber मध्ये 1.0-लीटर, 3-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 6250 rpm वर 72 PS चा पावर आणि 3500 rpm वर 96 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. याचा मायलेज 20 किलोमीटर प्रती लीटर इतका आहे.
किंमत आणि फीचर्स पाहता ही गाडी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी आहे.
संबंधित बातम्या :
Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक
Petrol की Diesel? कोणती कार खरेदी करणे फायदेशीर ठरणार?