भोपाळ : लोकप्रिय गझलकार, शायर राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी प्राणज्योत मालवली. ते 70 वर्षांचे होते. राहत इंदौरी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं आजच सोशल मीडियावरुन सांगितलं होतं. (Rahat Indori passes away in Indore)
“कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.” असे ट्वीट त्यांनी आज सकाळी केले होते.
राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हे कोव्हिड रुग्णालय आहे. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या मुलाने सकाळी दिली होती. इंदौरी यांचे वय 70 वर्षे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोण होते राहत इंदौरी?
राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर होतेच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली होती. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली होती.
आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले होते.
राहत इंदौरी यांच्या काही शायरी
मैं लाख कह दूँ कि आकाश हूँ ज़मीं हूँ मैं, मगर उसे तो ख़बर है कि कुछ नहीं हूँ मैं।
अजीब लोग हैं मेरी तलाश में मुझ को, वहाँ पे ढूँड रहे हैं जहाँ नहीं हूँ मैं।
मैं आइनों से तो मायूस लौट आया था, मगर किसी ने बताया बहुत हसीं हूँ मैं।
वो ज़र्रे ज़र्रे में मौजूद है मगर मैं भी, कहीं कहीं हूँ कहाँ हूँ कहीं नहीं हूँ मैं।।
———
बीमार को मरज़ की दवा देनी चाहिए, मैं पीना चाहता हूँ पिला देनी चाहिए।
अल्लाह बरकतों से नवाज़ेगा इश्क़ में, है जितनी पूँजी पास लगा देनी चाहिए।
दिल भी किसी फ़क़ीर के हुजरे से कम नहीं, दुनिया यहीं पे ला के छुपा देनी चाहिए।
मैं ख़ुद भी करना चाहता हूँ अपना सामना, तुझ को भी अब नक़ाब उठा देनी चाहिए।।
—–
आंख में पानी रखो होंटों पे चिंगारी रखो, ज़िंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो।
राह के पत्थर से बढ़ कर कुछ नहीं हैं मंज़िलें, रास्ते आवाज़ देते हैं सफ़र जारी रखो।
एक ही नद्दी के हैं ये दो किनारे दोस्तो , दोस्ताना ज़िंदगी से मौत से यारी रखो ।
आते जाते पल ये कहते हैं हमारे कान में , कूच का ऐलान होने को है तय्यारी रखो ।।
(Rahat Indori passes away in Indore)
संबंधित बातम्या
Rahat Indori | प्रख्यात गझलकार राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण