US Election : डोनाल्ड ट्रम्पना झटका, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका

| Updated on: Nov 06, 2020 | 11:22 AM

डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा करत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली होती. या मागणीवर ट्रम्प त्यांच्या मागणीवर एकाकी पडल्याचे चित्र आहे. Republican officials distance themselves from Donald Trump claims of election fraud

US Election : डोनाल्ड ट्रम्पना झटका, रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांची ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची मतमोजणी अजूनही सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना 264 इलेक्ट्रोल वोटस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 इलेक्ट्रोल वोटस मिळाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा करत मतमोजणी थांबवण्याची मागणी केली होती. या मागणीवर ट्रम्प त्यांच्या पक्षातच एकाकी पडल्याचे चित्र आहे. रिपब्लिकन पक्षातील अनेक नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. (Republican officials distance themselves from Donald Trump claims of election fraud)

रिपब्लिकन पक्षातील काही नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने उभे राहत आहेत. तर, काही नेत्यानी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली आहे. उटाह येथील सिनेटर मिट रोमनी यांनी “प्रत्येक मताची मोजणी होणे हे लोकशाहीचे ह्रदय आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ, उमेदवारांसाठी त्रस्त करणारी असेल.पण, मतमोजणी होणार आहे. कोणतिही चुकीची गोष्ट घडली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. कोर्ट त्यावर मार्ग काढेल. आपल्याला लोकशाही, संविधान आणि अमेरिकन जनतेवर विश्वास असला पाहिजे, असं मिट रोमनी म्हणाले.

पेन्सिल्वेनियामधील सिनेटर पॅट टॉमी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. “पेन्सिल्वेनियाच्या कायद्यानुसार मतदान झालेल्या प्रत्येक मताची मोजणी केली जाणार आहे. कितीही वेळ लागला तरी मतमोजणी होईल”, अशी भूमिका पॅट टॉमींनी घेतली.

रिपब्लिकन पक्षाचे मॅरिलँडचे गव्हर्नर लॅरी होगन यांनी उघडपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. डोनाल्ड ट्रम्प यापूर्वीही असा प्रकार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कोणतिही व्यक्ती किंवा निवडणूक लोकशाहीपेक्षा मोठी नाही, असंही होगन म्हणाले.

पेन्सिल्वेनियात बायडन यांच्याकडून कडवी झुंज

पेन्सिल्वेनिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. मात्र, पेन्सिल्वेनियामध्ये बायडन यांनी कमबॅक केलं असून दोन्ही उमेदवारांमध्ये कडवी लढत सुरु आहे. जॉर्जियामध्ये बायडन आणि ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. इथेही ट्रम्प आघाडीवर आहेत. पेन्सिल्वेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि जॉर्जियामधील सर्व मतं मिळाली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाली तरी 270 मतांचा टप्पा पार करण्यासाठी ती अपुरी आहेत.

संबंधित बातम्या :

US Election 2020 : जय-पराजयाचा फैसला मी किंवा बायडन नव्हे, तर न्यायमूर्ती करणार : डोनाल्ड ट्रम्प

US Election 2020: ‘लोकशाहीत असं होतं, धीर धरा, आपणच जिंकणार आहोत’, बायडन यांचा पुन्हा विजयी नारा

(Republican officials distance themselves from Donald Trump claims of election fraud)