पुणे – मागील आठवडयापासून शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरतीला कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करणार असून , नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई कारण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. शहरातील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आठवड्यात रुग्णसंख्येत वाढ
शहरात 27 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झातयाचे दिसून आले आहे. यामध्ये प्रामुख्याने लसीचे दोन्हीडोस घेतलेल्या रुग्णांची संख्या 80 ते 85 टक्के आहे. परंतु या बाधित लोकांमध्ये अनेकांना सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. यासगळ्या गोष्टी लक्षात घेता महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सर्तक झाली आहे.शहरातील 2500 कोरोना रुग्णांपैकी 346 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहेत.इतर रुग्ण ठीक असल्याचेही त्यांनी सांगितले. .
निर्बंध कडक करणार
कोरोना व ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्या लक्षात घेत शहरात निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अद्यापही अनेक लोक कोरोनाच्या नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे कोरोनाचे निर्बंध आणखी कडक करणार आहे. हॉटेल विमानतळ, याठिकाणी नियम पाळले जात नाहीत. उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे. असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
प्रशासन सज्ज
महापालिकेच्या दवाखान्यात ४ हजार रेमडीसीव्हीर शिल्लक आहेत. तर 1800 बेड 9500 लिटर पर मिनिटं ऑक्सिजन तयार होतोय. नऊ ठिकाणी ऑक्सिजन साठा तयार होतोय. जम्बो हॉस्पिटलमध्ये ही तयारी झाली आहे. सर्व तयारी करायचं झालातर आठवड्यातही पूर्ण होऊ शकते.
Ravi Pujari: छोटा राजनचा हस्तक सुरेश पुजारी विरोधात मुंबई एटीएसकडून नवीन गुन्हा दाखल
फेब्रुवारीत Samsung चे दोन नवीन 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून घ्या फोनमध्ये काय असेल खास?