भारतीय सैन्य उत्तर देईल, पण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून सैन्याला पाठिंबा द्या : ब्रि. हेमंत महाजन

| Updated on: Jun 16, 2020 | 3:59 PM

भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे 3 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी 130 कोटी भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय (Brigadier Hemant Mahajan on China).

भारतीय सैन्य उत्तर देईल, पण चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून सैन्याला पाठिंबा द्या : ब्रि. हेमंत महाजन
Follow us on

पुणे : भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे 3 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी 130 कोटी भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय (Brigadier Hemant Mahajan on China). चीनच्या गोळीबाराला भारतीय सैन्य योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी उत्तर देईन. मात्र 130 कोटी भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहावं. भारतीयांना वस्तू विकून मिळालेल्या नफ्यातूनच चीन आक्रमक झाल्याचं मत हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं.

हेमंत महाजन म्हणाले, “1969 नंतर भारत आणि चीन हद्दीवर कधीही गोळीबार झाला नव्हता. मात्र त्यानंतरची झालेले ही घटना गंभीर आहे. यानंतर आता भारतीय सैन्य कुठं, कधी आणि कशा पद्धतीने प्रतिहल्ला करेल हे एक महत्त्वाचं आहे. हा एक सैनिकी निर्णय असून तो योग्य वेळी योग्य ठिकाणी सैन्य घेईन. यावेळी चीनची आक्रमकता वाढली आहे. लडाखमध्ये त्यांनी भारतीय सैनिकांवर काठीने हल्ला केला आणि आता गोळीबार केल्याने हे गंभीर आहे. त्याला प्रत्युत्तर हे द्यायलाच हवे. यासंदर्भात सर्व भारतीयांनी एक जूट होऊन भारतीय सैन्यासोबत उभा राहिलं पाहिजे. काहीजण चीनला आपला शत्रू मानत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर घातलेला बहिष्कार हा योग्य निर्णय आहे.”

“गेल्या वर्षी चीनने मोठ्या प्रमाणात भारतीयांना वस्तू विकला आणि नफा कमावला. त्याचा उपयोग लष्कराचं बजेट वाढवण्यासाठी केला. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रं आले आणि लष्कर आक्रमक झालं. त्यांनी त्यांच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणासाठी आपला पैसा वापरला. म्हणूनच 130 कोटी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून सैन्याच्या पाठीशी उभे राहावे. ही दीर्घकालीन लढाई आहे आणि सध्या सर्व भारतीयांनी लष्कराच्या पाठीमागे उभारायला पाहिजे,” असंही हेमंत महाजन म्हणाले.

दरम्यान, भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील लडाखमधील गलवान खोऱ्यात ही चकमक झाली. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. (India china firing at Galwan Valley)

1993 च्या सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर 1975 नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे. 1975 नंतर संघर्षात प्रथमच जवानांचा मृत्यू झाला. 1975 ला भारताचे 4 जवान शहीद झाले होते. 1975 ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.

सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये हे प्रकरण शांत करण्यासाठी घटनास्थळावर बैठक होत आहे. गलवान खोरं हे भारत-चीन सीमेवरील लडाख सीमेजवळचा भाग आहे. यावरुनच चीनच्या कुरापती वाढल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनामुळे चीनच्या विरोधात उभा आहे. अशा परिस्थितीत कोरोनावरुन लक्ष हटवण्यासाठी चीन अशाप्रकारच्या कुरापती करत आहे, असं संरक्षक तज्ज्ञांचं मत आहे.

चीनच्या या कुरापती पाहता त्यांना उत्तर देणं गरजेचं आहे. भारताने चीनला जशास तसं उत्तर द्यायला हवं, असंही संरक्षक तज्ज्ञ म्हणाले.

चीनचे 5 जवान ठार झाल्याचा दावा

दरम्यान, आपल्याही पाच जवानांचा मृत्यू झाल्याचा दावा चीनच्या ग्लोबल टाईम्सच्या रिपोर्टरने केला आहे. इतकंच नाही तर भारताच्या हल्ल्यात चीनचे 11 जवान जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

भारत-चीनदरम्यान झडप, भारताचे तीन जवान शहीद, 1975 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर गोळीबार

India China Violent Face off Live | भारत-चीनच्या सैन्यांमध्ये संघर्ष, दिल्लीत वेगवान घडामोडी

संबंधित बातम्या :


Brigadier Hemant Mahajan on China