मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येशी संबंधित ड्रग्ज प्रकरणामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेले 15 दिवस मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. मुंबईतील विशेष कोर्टाने तिला 6 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर जामीन अर्जावर आज (24 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)
मुसळधार पावसामुळे कोर्टाने सुट्टी जाहीर केल्याने काल (बुधवार 23 सप्टेंबर) होणारी सुनावणी पुढे ढकलली गेली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल रिया आणि शौविकच्या जामीन अर्जाची सुनावणी करणार आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या रिया चक्रवर्तीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे की, मी निर्दोष असून, एनसीबी जाणीवपूर्वक माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर गंभीर आरोप करत आहे. मुंबई पोलीस, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय), एनसीबी, अंमलबजावणी संचालनालयच्या (ईडी) चौकशीचा संदर्भ देत, ‘मी केवळ 28 वर्षांची असून, एनसीबीच्या तपासाव्यतिरिक्त एकाच वेळी पोलीस आणि केंद्रीय एजन्सीमार्फत तीन तपासांसोबत मीडिया ट्रायललाही सामोरी जात आहे’, असे तिने मंगळवारी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात म्हटले आहे.
याशिवाय तिने जामीन अर्जात सुशांत सिंह राजपूतने ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी आपला वापर केल्याचा आरोप केला आहे. एनसीबीच्या पुराव्यांनुसार सुशांतने माझा आणि भाऊ शौविकचा ड्रग्जसाठी वापर केल्याचे स्पष्ट होत असल्याचे रियाने आपल्या याचिकेत म्हटले आहे. आम्हीच नव्हे तर, सुशांतने त्याच्या जवळच्या इतर माणसांचाही केवळ ड्रग्जसाठीच वापर केल्याचा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे.
या सर्व गोष्टींचा रियाच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम झाला आहे. न्यायालयीन कोठडीत वाढ झाल्यास तिची मानसिक स्थिती आणखी खालावेल, असे तिने आपल्या वकिलांमार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
न्यायाधीश सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर चक्रवर्ती यांच्या जामीन अर्जावर बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार होती. परंतु मुंबईत मुसळधार पावसामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी कार्यवाही तहकूब केली आणि आता यावर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
जामिनासाठी धावाधाव
अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 6 ते 8 सप्टेंबर या काळात एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 सप्टेंबरला तिला अटक झाली. 8 सप्टेंबर रोजी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचवेळी तिने महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर रियाने 9 सप्टेंबर रोजी मुंबई सेशन कोर्टातील एनडीपीएस विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 11 सप्टेंबर रोजी सेशन कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता. रिया आणि शौविक यांनी 22 सप्टेंबर रोजी रिया आणि शौविक या दोघांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यावर काल 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण पावसामुळे कोर्टाला सुट्टी असल्याने जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. (Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)
रियाने ड्रग्ज देवाण-घेवाणीत आपला सहभाग असल्याचे मान्य केल्यावर एनसीबीकडून तिला अटक करण्यात आली होती. रिया चक्रवर्ती या प्रकरणात दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
Deepika Padukone | एनसीबी समन्सनंतर दीपिका चार्टर्ड विमानाने मुंबईला, रणवीरही टेंशनमध्ये https://t.co/mWtUT99tqC #DeepikaPadukone #RanveerSingh
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2020
संबंधित बातम्या :
रियामागची शुक्लकाष्ट संपेना, पावसामुळे जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर
रिया चक्रवर्ती आणखी अडचणीत; न्यायालयीन कोठडीत 6 ऑक्टोबरपर्यंत वाढ!
(Rhea Chakraborty bail hearing at Mumbai High court)