मुंबई : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयला ड्रग्ज अँगल सापडल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात ‘एनसीबी’ने तपासात उडी घेतली आहे. सॅम्युअल मिरांडा आणि शोविक चक्रवर्ती यांच्यापाठोपाठ अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिलाही अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या चार गाड्या सकाळीच रियाच्या घराखाली दाखल झाल्या. रिया अटकेसाठी तयार असल्याची माहिती तिचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली. (Rhea Chakraborty NCB inquiry in Sushant Singh Rajput Case Drugs angle)
“रिया अटकेसाठी तयार आहे कारण हे एक ‘विच हंट’ (संशयितांची धरपकड) आहे. जर एखाद्यावर प्रेम करणे हा गुन्हा असेल, तर तिला तिच्या प्रेमाचे परिणाम भोगावे लागतील. निर्दोष असल्याने, तिने बिहार पोलिसांसह सीबीआय, ईडी आणि एनसीबीने दाखल केलेल्या केसमध्ये अटकपूर्व जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात धाव घेतली नाही” अशी माहिती रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी दिली.
Rhea is ready for arrest as this is a Witch Hunt and if Loving someone is a crime she will face the consequences of her love. Being innocent, She has not approached any court for Anticipatory Bail in all the cases foisted by Bihar Police now with CBI , ED and NCB : Lawyer
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) September 6, 2020
एनसीबीने रियाला समन्स बजावलं आहे. सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होणार आहे. स्वतः चौकशीसाठी येणार की आमच्यासोबत असा पर्याय एनसीबीने रियाला दिला होता, त्यानंतर तिने स्वतः हजर होऊ असं सांगितलं. मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात रिया सकाळी 11 वाजताच्या सुमारास एनसीबी कार्यालयात रवाना झाली. सुशांतचा फोटोग्राफर दीपेश सावंतला 9 सप्टेंबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे.
He (Dipesh Sawant) was in their (NCB) custody since Sept 4, without his family being informed. He should’ve been produced before court within 24 hrs. We’ve filed a plea against him being kept in custody for over 24 hrs. Court has called for reply from NCB: Dipesh Sawant’s lawyer https://t.co/BQ8AAGhANq pic.twitter.com/iI7qyZiGMr
— ANI (@ANI) September 6, 2020
एनसीबीच्या कार्यालयातील महिलांच्या कोठडीची साफसफाई झाल्याने रियाच्या अटकेचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. (Rhea Chakraborty NCB inquiry in Sushant Singh Rajput Case Drugs angle)
NCB दफ्तर में महिला लॉकअप की हुई सफाई!!
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) September 6, 2020
आधीच अटकेत असलेले शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांच्या जोडीने रिया चक्रवर्तीला समोरासमोर बसवून एनसीबी चौकशी करु शकते. चौकशीनंतर रियाला अटक होण्याचीही शक्यता आहे.
शोविक चक्रवर्तीला दोन दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरु आहे. संदीप सिंह, मितू सिंह आणि श्वेता सिंह यांचे काल जबाब नोंदवण्यात आले आहेत. सुशांतची मैत्रीण स्मिता पारिख यांचाही जबाब घेण्यात आला आहे.
मागील सहा दिवसात एनसीबीने नऊ जणांना अटक केली आहे. त्यापैकी तिघा जणांना जामीन मंजूर झाला आहे. रिया आणि शोविकच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये बड्स आणि डब्ज या ड्रग्ज तस्करीत वापरल्या जाणाऱ्या सांकेतिक शब्दांचा वापर केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच एनसीबीने यांच्याभोवतीचा फास आवळला आहे. (Rhea Chakraborty NCB inquiry in Sushant Singh Rajput Case Drugs angle)