मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करताना ड्रग्ज कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक केली. रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिची रवानगी आज भायखळा तुरुंगात होणार आहे. (Rhea Chakraborty to be taken to Byculla Jail after NCB arrest)
रियाला काल (मंगळवार 8 सप्टेंबर) दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला. एनसीबीकडून सलग तीन दिवस रियाची चौकशी सुरु होती. तीन दिवस मिळून जवळपास 15 तास चौकशी करण्यात आली.
रियाचा मुक्काम मंगळवारच्या रात्री NCB कार्यालयात झाला. एनसीबी कार्यालयाचे गेट रात्रभर बंद ठेवण्यात आले होते, तर बाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. तुरुंगाच्या नियम पुस्तकानुसार संध्याकाळी तुरुंगातील कैद्यांची मोजणी झाल्यानंतर नवीन कैदी घेतले जात नाहीत. त्यामुळे रियाला संपूर्ण रात्र एनसीबी कार्यालयात ठेवण्यात आले. आज सकाळी तिला भायखळाला तुरुंगात नेले जाईल.
रियाच्या जामिनासाठी तिचे वकील सेशन्स कोर्टात (सत्र न्यायालय) जाणार आहेत. वकील सतीश मानेशिंदे आज सकाळी 10 वाजता सत्र न्यायालयात अपील करतील. भायखळा तुरुंगात नेण्यासाठी सकाळी 9 वाजताची वेळ नियोजित असली, तरी एनसीबी कोर्टाच्या निर्णयासाठी थांबू शकते. त्यामुळे भायखळा तुरुंग की घर असे दोन मार्ग रियासमोर असतील. सेशन्स कोर्टात तिला जामीन न मिळाल्यास हायकोर्ट आणि पुढे सुप्रीम कोर्ट हे पर्याय असतील.
जामीन का नाही?
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला एनसीबीने कलम 27 (A) अंतर्गत अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा हा गुन्हा आहे. त्यानुसार 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही.
रियाने चौकशीत आपला गुन्हा कबूल केला होता. सुशांतला आपण ड्रग्ज पुरवत असल्याचे तिने सांगितले, पण आपणही ड्रग्ज घेत होतो, अशी कबुली रियाने चौकशीत दिलेली नाही.
अटकेनंतर काय काय झालं?
रियाला अटक केल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना देण्यात आली. यानंतर मेडिकल तपासणीसाठी रियाला सायन हॉस्पिटल नेण्यात आले. वैद्यकीय अहवालात तिची प्रकृती ठीक असल्याचे समजले. तिचा कोरोना चाचणी अहवालही निगेटिव्ह आला. त्यानंतर संध्याकाळी 7.40 वाजता तिला एनसीबी कार्यालयात परत आणण्यात आले. रात्री साडेआठ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रियाला कोर्टासमोर हजर केले होते, तेव्हा कोर्टाने तिचा जामीन फेटाळला. (Rhea Chakraborty to be taken to Byculla Jail after NCB arrest)
रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला चार दिवसांपूर्वीच एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली. या सर्वांची चौकशी सुरु आहे. गेल्या आठ दिवसात एनसीबीने केलेली ही दहावी अटक आहे. त्यापैकी तिघा जणांना जामीन मंजूर झाला आहे.
दरम्यान, सुशांत नियमितपणे फिरायला येत असलेल्या लोणावळ्याजवळील ‘हँग आऊट व्हिला’ या बंगल्यावर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची टीम तपासणीसाठी गेली.
VIDEO : ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी रियाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीhttps://t.co/9ZEzUTwYJt
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
संबंधित बातमी :
Rhea Chakraborty Arrest | रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक
(Rhea Chakraborty to be taken to Byculla Jail after NCB arrest)