पाणी पुरीचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते, परंतू पाणीपुरी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचे झाले काय कर्नाटकात खाद्य पदार्थांचे नमूने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी नेण्यात आले तेव्हा त्या पाणी पुरीच्या पाण्याची देखील तपासणी करण्यात आली. यात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला ( FSSAI ) त्यांच्या तपासणीत कॅन्सर सारख्या आजारांना आमंत्रण देणारे घटक सापडले आहेत. एकूण 260 जागांवरुन पाणीपुरीचे नमूने गोळा करण्यात आले होते. त्याच्या तपासणीत धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे.
कर्नाटकातील पाणीपुरी विक्री करणाऱ्या दुकानांवर धाड घालण्यात आली होती. त्यावेळी FSSAI केलेल्या तपासणीत 260 जागी पाणीपुरीचे नमूने घेतले. यात 41 नमून्यात नकली रंग आणि कॅन्सरला आमंत्रण देणारे घटक सापडले. यातील 18 नमूने तर इतके खराब होते. ते खाण्यालायक नव्हते. कर्नाटकातील विविध ठिकाणी रस्त्यावर पाणीपुरी आणि इतर खाद्यपदार्थातील अस्वच्छतेचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कमिशनर श्रीनिवास के.यांनी एका वृ्त्तपत्राला सांगितले की आम्ही रस्त्यांवरील खाद्य पदार्थांसह आलिशान हॉटेलातील खाद्यपदार्थांचे नमूने तपासले. अनेक नमूने तर खाण्यालायकही नव्हते. त्यावर बुरशी देखील सापडली. कर्नाटकातील नमूने तपासण्यात आले तेव्हा पाणीपुरीच्या सॅम्पल रोडामीन-बी फूड कलर प्रतिबंध लावण्यात आला आहे.
रासायनिक रंगांमुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. याच वर्षी कर्नाटकातील सरकारने रोडामीन – बी नामक फूड कलरवर प्रतिबंध लावला होता. आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले की जर कोणताही दुकानदार अशा केमिकल्सचा वापर करताना आढळला तर त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असेही या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
खाद्यपदार्थात कोणते रंग वापरले जात आहेत. याची तपासणी आमचे सरकार करीत आहेत. नागरिकांनी ते कोणत्या प्रकारचे अन्न खातात आणि त्यात काय मिसळले जाते याची काळजी घेण्याचा सल्लाही आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिला आहे. रेस्टॉरंट मालकांनीही जेवण बनविण्याच्या जागांची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पाळावी, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसे न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.