मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी केली आहे (Rishi Kapoor on Emergency amid Corona). देशात आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी सैन्याच्या मदतीची गरज व्यक्त केली. ऋषी कपूर यांनी सातत्याने कोरोना संसर्गाविषयी आणि त्या परिस्थितीत सुरु असलेल्या उपाययोजनांवर आपली मतं ट्विटद्वारे मांडली आहेत.
Aaj ye hua kal kya kya hona hai? That is why I said we need the military out. Emergency.
— Rishi Kapoor (@chintskap) March 31, 2020
ऋषी कपूर यांनी आपल्या अलिकडील ट्विटमध्ये म्हटलं आहे, “आज हे होत आहे, उद्या काय होणार आहे? म्हणूनच आपल्याला सैन्याच्या मदतीची गरज आहे असं मी म्हणतो आहे. आणीबाणी.” ऋषी कपूर यांनी याआधी देशभरात सुरु असलेल्या बनावट आणि अस्वच्छ मास्कच्या उत्पादनावरही बोट ठेवलं होतं. पत्रकार मधू तेहरान यांचं एक ट्विट रिट्विट करत त्यांनी त्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली होती. तेहरान यांनी काही ठिकाणी मास्कचं अत्यंत निकृष्ठपणे होणाऱ्या मास्क उत्पादनाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काही लोक बनावट मास्क, बनावट कोरोना चाचणी किट, तपासणी न केलेले व्हेंटिलेटर बाजारात विकत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला होता. तसेच यावर सरकारचं नियंत्रण आहे का? असा सवाल उपस्थित केला होता.
Needs immediate action https://t.co/CBq33TxyZz
— Rishi Kapoor (@chintskap) March 31, 2020
दरम्यान, ऋषी कपूर यांनी सरकारकडे किमान संध्याकाळी सुरु करण्याची मागणी केली होती (Rishi Kapoor demand to open liquor shop). कोरोनाच्या संसर्गाची भीती आणि लॉकडाऊनमुळे घरात बंद असल्याने लोक नैराश्यात आहेत. त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळावा म्हणून दारुची दुकानं सुरु करा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली होती.
ऋषी कपूर म्हणाले होते, “सरकारने सायंकाळी काही वेळासाठी सरकारी परवाना असलेली दारुची दुकानं उघडी ठेवायला हवीत. मला चुकीचं समजू नका. लोक आपआपल्या घरी प्रचंड नैराष्य घेऊन थांबले आहेत. त्यांच्या अवतीभवती प्रचंड अश्चितता आहे. पोलिस, डॉक्टर आणि नागरिकांना ताण कमी करायचा आहे. तशीही काळ्याबाजारात दारुची विक्री सुरुच आहे. सरकारलाही उत्पादन शुल्काचा (एक्साईज) पैसा हवाच आहे. उद्विग्नतेसोबत नैराश्यही द्यायला नको. तसेही लोक पीत आहेतच, तर मग त्याला कायदेशीर करुन टाका. बघा विचार करा.”
संबंधित बातम्या :
संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा, अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी