अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कर्जतच्या ग्रामदैवताचे दर्शन घेतले. पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे भक्तासांठी पुन्हा उघडल्यानंतर रोहित पवार यांनी गोदड महाराजांचे (Godad Maharaj) दर्शन घेतले. जनतेवरील अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी रोहित पवारांनी ग्रामदेवतेला साकडं घातलं. (Rohit Pawar takes blessings of Godad Maharaj in Karjat after temples reopen on Padwa)
“मंदिराचे दार आज सर्वसामान्यांसाठी उघडण्यात आले. राज्य सरकारचे मी आभार मानतो. कोरोनाच्या काळात गेल्या आठ महिन्यात आरोग्याचा विषय महत्वाचा होता, त्यामुळे अनेक अडचणी होत्या. लोकांनी एकत्र आल्यानंतर अनेक अडचणी वाढू शकतात. मात्र भाविकांनी नियमांचं पालन करावं” असं आवाहन रोहित पवार यांनी केलं.
“पाडव्याच्या दिवशी मंदिरं उघडण्याबाबत सरकारने जो निर्णय घेतला, तो चांगला आहे. त्यामुळे मी गोदड महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलो. भक्तांनीही काळजी घ्यावी. ज्या काही आर्थिक अडचणी जनतेवर आल्या असतील, त्या दूर होऊ देत” असं साकडं रोहित पवारांनी घातलं.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी बंद ठेवलेली धार्मिक स्थळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी पुन्हा खुली झाली आहेत. राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं आजपासून खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे आजच्या मंगल दिनी बहुसंख्य मंदिरात भक्तांना प्रवेश देण्यात येत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त तुळजाभवानीची शिवकालीन अलंकार पूजा, दर्शनासाठी राज्यभरातून भाविक तुळजापुरात https://t.co/7QKV3usdCJ @CMOMaharashtra @OfficeofUT #Temple
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 16, 2020
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक भल्या पहाटे दाखल झाले. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद या ठिकाणाहून भाविक सहकुटुंब आले होते. शिर्डीचे साई मंदिर खुले झाल्याने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली. पुण्यातही श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी आहे.
बुलडाण्यात शेगांवचं गजानन महाराज मंदिर आज उघडणार नाही आहे. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर भाविकांसाठी उद्या (17 नोव्हेंबर) पासून उघडणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. तर दर्शनासाठी ई-पास घ्यावा लागणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
‘या’ दोन मंदिरांचे दरवाजे भक्तांसाठी आजही बंद, जाणून घ्या कारण
(Rohit Pawar takes blessings of Godad Maharaj in Karjat after temples reopen on Padwa)