पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सलामीवीर रोहित शर्माला भेटण्यासाठी चाहता सुरक्षा भेदून मैदानात दाखल झाला.
मैदानात दाखल झालेला हा चाहता थेट रोहितच्या पायांवर येऊन पडला. रोहितच्या बाजूलाच अजिंक्य रहाणेही उपस्थित होता.
रोहित शर्मा स्लीपला उभा असताना अनपेक्षितपणे चाहता थेट पायांवर येऊन पडल्याने रोहित शर्माही गोंधळला आणि तोही खाली पडला.
सेनुरान मुथुस्वामी बाद झाल्यानंतर वर्नेन फिलँडर खेळण्यासाठी आला तेव्हा हा प्रकार घडला. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील मालिकेतील हा तिसरा प्रकार आहे.
विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात एक चाहता मैदानात घुसला आणि त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत हस्तांदोलन केलं. त्याने इतर खेळाडूंसोबत सेल्फी घेण्याचाही प्रयत्न केला होता.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील टी-20 मालिकेतही असाच प्रकार घडला होता. मोहालीत चाहता मैदानात घुसल्यामुळे दोन वेळा खेळात व्यत्यय आला होता.