पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 31 मेपर्यंत लॉकडाऊन 4 लागू करण्यात (SSC and HSC results date) आला आहे. आधी राज्य सरकारने मग केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा केली. गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात अनेक परीक्षा रद्द झाल्या, तर ज्या परीक्षा झाल्या त्यांच्या निकालाबद्दल उत्सुकता आहे. (SSC and HSC results date)
महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाची चिंता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या निकालाच्या चुकीच्या तारखा व्हॉट्सअॅपसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र निकालाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत, त्यामुळे या तारखांवरील अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केलं आहे.
वाचा : EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?
कोरोनामुळे दहावी आणि बारावीचा निकाल उशिरा येण्याची शक्यता आहे. उत्तरपत्रिका शाळा, महाविद्यालयात अडकल्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प आहे. परिणामी नऊ विभागाच्या निकालाची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय निकालाच्या तारखा जाहीर करता येणार नाहीत, असं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द
राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गेल्या महिन्यात दहावीचा भूगोलाचा पेपर आधी पुढे ढकलला होता. त्यानंतर हा पेपर रद्द करत असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली होती. 21 मार्चला इतिहास आणि नागरिकशास्त्र विषयाचा पेपर झाला होता, मात्र 23 मार्चला नियोजित भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर हा पेपर रद्द करुन मागील पेपरमधील सरासरीने गुण देण्यास शिक्षण विभागाने सांगितलं होतं.
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, शिक्षण विभागाचा एसएससीच्या विद्यार्थ्यांना दिलासा
संबंधित बातम्या
EXCLUSIVE : दहावी-बारावीचा निकाल जाहीर करणाऱ्या बोर्डाच्या अध्यक्षांना किती टक्के?