रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?

| Updated on: Aug 01, 2020 | 10:32 PM

अमेरिकेत कोरोनाची लस आली, तर ती टोचून घेणार नाहीत, यासाठी एक चळवळ सुद्धा उभी (International Corona Vaccine And News Update) राहिलीय.

रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?
Follow us on

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यापासून रशिया संपूर्ण देशात कोरोनाची लस टोचणं सुरु करणार आहे. रशियाच्या आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी, रुग्णांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यानंतर संपूर्ण देशात घरोघरी जाऊन कोरोनाची लस दिली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात रशियातल्या लसीनं चाचणीचे तिन्ही टप्पे यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा रशियातील सरकार करणार आहे. मात्र या दाव्याबाबत अनेक देशांमधल्या तज्ज्ञांनी शंका व्यक्त केल्या आहेत. (International Corona Vaccine And News Update)

पेरु देशानं थेट 31 ऑगस्टपर्यंत आणीबाणीत वाढ केली आहे. दक्षिण अमेरिका खंडातला हा छोटासा देश कोरोनाच्या आकडेवारीत जगातला सातवा देश आहे. शिवाय सर्वात कमी लोकसंख्या असूनही सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्यांच्या यादीत पेरु हा एकमेव देश आहे.

दक्षिण कोरियात शिंचेओजी चर्चेच्या प्रमुखांना अटक केली गेली आहे. सरकारनं कोरोनाला रोखण्यासाठी ज्या योजना आखल्या होत्या. त्यात त्यांनी अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दक्षिण कोरियात कोरोनाची सुरुवात याच शिंचेओजी चर्चमधून झाली. सुरुवातीच्या टप्प्यात चर्चमध्ये प्रार्थनेसाठी येणारे तब्बल 4 हजार लोक कोरोनाबाधित आढळले होते. मात्र तरी सुद्दा चर्चच्या प्रमुखांनी माहिती लपवून ठेवली होती.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कोरोनाची लस अनिवार्य केली गेली, तरच ती घेईल, असं विधान उद्योजक राजीव बजाज यांनी केलं आहे. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्याचं वृत्त आहे. लस संशोधनात होत असणाऱ्या घाईबाबत शंका उपस्थित करुन त्यांनी हे विधान केलं. तूर्तास योग, होमियोपॅथी आणि शारिरिक अंतर या तीन गोष्टींवर माझा जास्त भर असल्याचंही राजीव बजाज म्हणाले. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाची लस आली, तर ती टोचून घेणार नाहीत, यासाठी एक चळवळ सुद्धा उभी राहिलीय.

मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स आता अमेरिकेतील चिनी टिकटॉकचा व्यवसाय विकत घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या सोमवारी त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती आहे. मात्र त्याआधीच अमेरिकेच्या सरकारनं टिकटॉक बंद करण्याचेही संकेत दिले आहेत. मात्र कमीत-कमी दरात व्यवसाय खरेदी व्हावा, यासाठी बंदीच्या बातम्या पेरल्या जात असल्याची चर्चा अमेरिकेच्या माध्यमांमध्ये सुरु झाली आहे. (International Corona Vaccine And News Update)

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात अफगाणच्या 15 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याला उत्तर म्हणून अफगाणिस्ताननं आपलं सैन्य आणि वायुदलाला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनामुळे पाकिस्ताननं अफगाणिस्तानला लागून असलेली बॉर्डर बंद केली आहे. तेव्हापासून दोघांमध्ये तणाव वाढत असतानाच काल पाकिस्तानकडून रॉकेट हल्ला झाल्याचा आरोप आहे.

हेही वाचा – कोरोनाचे निदान 30 मिनिटात, भारत-इस्रायलचे एकत्रित संशोधन सुरु, फोनवर आवाज ऐकूनही तपासणी

वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिल्यानंतर आता नेपाळच्या सरकारनं नवीन नकाशा संयुक्त राष्ट्र आणि गुगलकडे पाठवण्याची तयारी केली आहे. नेपाळनं वादग्रस्त नकाशात लिपूलेख आणि कालापानी हे भारतीय भूभाग स्वतःच्या हद्दीत दाखवले आहेत. मात्र याआधीच्या करारांमुळे नेपाळच्या वादग्रस्त नकाशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरुन मंजुरी मिळण्याची चिन्हं कमी आहेत.

पाकिस्तानी विमानांमधल्या सर्व कर्मचाऱ्यांची आता ब्रेथ अॅनालायझर टेस्ट होणार आहे. ज्याद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्यानं जर मद्य किंवा इतर गोष्टींच सेवन केलं असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी विमानाच्या चक्क कॉकपीटमध्ये एका कर्मचाऱ्यानं सिगारेट ओढल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या नागरी वाहतूक मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे. (International Corona Vaccine And News Update)

संबंधित बातम्या : 

चीन-अमेरिकेतली तणातणी वाढली, अमेरिकेचे 24 तासात दोन निर्णय, चीनच्या चिंतेत वाढ

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज