डोळं रोखून असं काय बघता… रशियन मंत्र्याच्या ‘नजरेनं’ जग हादरलं!

| Updated on: Dec 27, 2020 | 2:57 PM

रशियाच्या एका खासदाराने महिल्या मंत्र्याशी केलेल्या असभ्य वर्तनाने पूर्ण जग हादरुन गेलं आहे.

डोळं रोखून असं काय बघता... रशियन मंत्र्याच्या नजरेनं जग हादरलं!
Follow us on

नवी दिल्लीरशियन संसद सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. रशियाच्या एका खासदाराने महिल्या मंत्र्याशी केलेल्या असभ्य वर्तनाने पूर्ण जग हादरुन गेलं आहे. इतकं होऊनही त्याने आपल्या वागण्याला महिला मंत्र्यालाच दोषी ठरवलं. (Russian MP pyotr Ammosov misbehaviour of women minister Irina Vysokikh)

रशियन संसदेचं ऑनलाईन सत्र सुरु होतं. या सत्रात महिला मंत्री इरिना वयसोखिक (Irina Vysokikh) या भाषण करत होत्या. याच दरम्यान कम्युनिस्ट पार्टीचे खासदार पियोत्र अम्मोसोव (Russian MP pyotr Ammosov )यांनी इरिना यांचं भाषण ऐकण्याऐवजी त्यांच्या छातीकडे खूपवेळ एकटक लक्ष दिलं. ही बाब खा. इरिना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आक्रमक होत पियोत्र यांच्या वागण्यावर आक्षेप घेतला. मात्र तुमच्या कपड्यामुळे मी तुमचं भाषण ऐकलं नाही, असं बेजबाबदार स्पष्टीकरण पियोत्र यांनी दिलं.

पियोत्र यांच्याकडून लाज आणणारं वक्तव्य

याकूतिका येथे सुरु असलेल्या संसदेच्या सत्रादरम्यान पियोत्र म्हणाले, “एक निरोगी व्यक्ती म्हणून मी त्यांच्या शरीरावरील एका भागावर लक्ष केंद्रित केलं. यामुळे मी त्यांचं भाषण ऐकू शकलो नाही. मी हे बरोबर केलं नाही परंतु मी एक पुरुष असल्याने तसंच त्या अतिशय सुंदर असल्याने मी त्यांच्याकडे….” असं लाज आणणारं स्पष्टीकरण पियोत्र यांनी दिलं.

संसदेच्या सभापतींनी महिला मंत्र्याचा आवाज दाबला

मंत्री इरिना वयसोखिक यांनी पियोत्र यांच्या आक्षेपार्ह वागण्यावर आक्षेप घेतला तसंच संसदेत हा मुद्दा उपस्थित करत पियोत्र यांच्याकडे माफीची मागणी केली. मात्र संसदेच्या सभापतींनी इरिना यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आपण आपल्या रिपोर्टवर बोला. या मुद्द्यांवर आपण बोलू नका. खासदारांवर वक्तव्य करण्याचा आपल्याला कसलाही अधिकार नाही. याविषयी वरिष्ठांकडेड तक्रार केली जाईल

अन्य खासदारांकडून झालेल्या प्रकाराबद्दल माफी

सत्रात उपस्थित असलेल्या अन्य खासदारांनी पियोत्र यांचं वागणं खरोखर चुकलं असल्याचं म्हटलं. झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी इरिना यांची माफीही मागितली. त्यांचं वागणं चुकीचं आणि आक्षेपार्ह आहे झालेल्या प्रकाराबद्दल त्यांच्यावतीने आम्ही माफी मागतो, असं उपस्थित खासदार म्हणाले. मात्र ज्या खासदारामुळे हा सगळा संताप आणणारा प्रकार घडला त्या पियोत्र यांनी माफी मागण्यास नकार दिला.

(Russian MP pyotr Ammosov misbehaviour of women minister Irina Vysokikh)

हे ही वाचा :

Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?

राजस्थानच्या गेहलोत सरकारवर मोदी सरकार खुश! काय आहे कारण?