बारामती : तानाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित अभिनेता अजय देवगनची (Ajay Devgn) मुख्य भूमिका असलेल्या ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर (Tanhaji: The Unsung Warrior trailer) पाहून ‘संभाजी ब्रिगेड’ चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘तान्हाजी’च्या ट्रेलरमध्ये संत रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) काहीतरी ‘फेकून’ मारत असल्याचं दाखवल्याने ‘संभाजी ब्रिगेड’ने हे दृश्य वगळण्याची मागणी केली आहे. अन्यथा ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा (Sambhaji Brigade against Tanhaji Movie) देण्यात आला आहे.
‘प्रत्येक चित्रपटात काहीतरी गंभीर आणि चुकीचं, वादग्रस्त दाखवून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या चित्रपटातून हा प्रसंग वगळला गेला पाहिजे. एवढीच ‘संभाजी ब्रिगेड’ची माफक अपेक्षा आहे. या चित्रपटातून संबंधित वादग्रस्त सीन वगळला नाही, तर ‘संभाजी ब्रिगेड’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’ असा इशाराही संभाजी ब्रिगेडच्या वतीने संतोष शिंदे यांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना दिला.
शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शरद केळकरच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट
बहुप्रतिक्षित ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ चित्रपटाचा ट्रेलर काल (मंगळवारी) रिलीज झाला (Tanhaji: The Unsung Warrior trailer). यामध्ये अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या, तर मराठमोळा अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) उदयभान, तर अभिनेत्री काजोल (Kajol) ही तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांच्या भूमिकेत झळकत आहे. याशिवाय अजिंक्य देव, देवदत्त नागे यासारखे मराठी कलाकारही चित्रपटात भूमिका साकारत आहेत.
ओम राऊत (Om Raut) यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तानाजी मालुसरेंची ही शौर्यगाथा 3डी मध्ये बघायला मिळणार आहे. 10 जानेवारी 2020 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा…
‘तान्हाजी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला. अभिनेता शरद केळकरला शिवाजी महाराजांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. मात्र, हा प्रश्न विचारताना पत्रकाराने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्यावेळी शरद केळकरने त्यांची चूक सुधारत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असं म्हणायला सांगितलं. शरद केळकरचं उत्तर ऐकून सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी शरद केळकरचं कौतुक केलं आहे. शरदचं उत्तर ऐकून अंगावर काटा उभा राहत असल्याच्या भावना अनेक जणांनी (Sambhaji Brigade against Tanhaji Movie) व्यक्त केल्या आहेत.