सांगलीचा विळखा वाढला, 12 नवे पॉझिटिव्ह, एकट्या इस्लामपुरात 23 कोरोना रुग्ण

| Updated on: Mar 27, 2020 | 4:58 PM

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा (Sangli Corona case update) वाढत असल्याचं दिसत आहे.

सांगलीचा विळखा वाढला, 12 नवे पॉझिटिव्ह, एकट्या इस्लामपुरात 23 कोरोना रुग्ण
Follow us on

सांगली : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, तिकडे सांगली जिल्ह्यात कोरोनाचा विळखा (Sangli Corona case update) वाढत असल्याचं दिसत आहे. कारण सांगलीत आज तब्बल 12 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले (Sangli Corona case update) आहेत. सांगलीतील इस्लामपुरात आज 12 नवे रुग्ण आढळल्याने सांगलीतील कोरोनाबाधितांची संख्या 23 वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल 147 वर पोहोचला आहे.

महत्त्वाचं म्हणजे इस्लामपुरात जे 12 नवे रुग्ण आढळले आहेत, ते पूर्वीच्याच्या 4 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आले होते. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. ज्या कुटुंबातील चौघांना लागण झाली होती, त्यांचं कुटुंब मोठं आहे.

या कुटुंबातील आधीच चौघांना कोरोनाची लागण झाली होती. हे चौघे हज यात्रा करुन आले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांची चाचणी केली असता, 25 मार्चला आणखी पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी 12 जणांची चाचणी केली असता, त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत.

हे कुटुंब इस्लामपूरमधील आहे. महत्त्वाचं म्हणजे या कुटुंबाने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या २७ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती, जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला दिली होती.

सांगलीतील या कोरोनाबाधित रुग्णांवर मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. चार दिवसांपूर्वी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यामध्ये आधी पाच आणि आता बारा जणांची भर पडली आहे.

आधी चौघांना लागण

इस्लामपुरातील या कुटुंबातील आधी चौघांना कोरोना लागण झाल्याची माहिती 23 मार्चला समोर आली होती. हे चारही जण नुकतेच सौदी अरेबियातून आले होते. ते हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते. संबंधित कोरोना बाधित रुग्णांना सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. त्या चौघांचे कोरोना अहवाल दोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे राज्यात चांगलीच खळबळ उडाली. या सर्वांवर मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51
पुणे – 20
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 23
नागपूर – 9
कल्याण – 5
ठाणे – 5
नवी मुंबई – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1

एकूण 147

(Maharashtra Corona Patients Increase)

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च – कोरोनामुक्त
पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
नागपूर (1) – 12 मार्च
पुणे (1) – 12 मार्च
पुणे (3) – 12 मार्च
ठाणे (1) – 12 मार्च
मुंबई (1) – 12 मार्च
नागपूर (2) – 13 मार्च
पुणे (1) – 13 मार्च
अहमदनगर (1) – 13 मार्च
मुंबई (1) – 13 मार्च
नागपूर (1) – 14 मार्च
यवतमाळ (2) – 14 मार्च
मुंबई (1) – 14 मार्च
वाशी (1) – 14 मार्च
पनवेल (1) – 14 मार्च
कल्याण (1) – 14 मार्च
पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
औरंगाबाद (1) – 15 मार्च
पुणे (1) – 15 मार्च
मुंबई (3) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
यवतमाळ (1) – 16 मार्च
नवी मुंबई (1) – 16 मार्च
मुंबई (1) – 17 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 17 मार्च
पुणे (1) – 18 मार्च
पिंपरी चिंचवड (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 18 मार्च
रत्नागिरी (1) – 18 मार्च
मुंबई (1) – 19 मार्च
उल्हासनगर (1) – 19 मार्च
अहमदनगर (1) – 19 मार्च
मुंबई (2) – 20 मार्च
पुणे (1) – 20 मार्च
पिंपरी चिंचवड (1)- 20 मार्च
पुणे (2) – 21 मार्च
मुंबई (8) – 21 मार्च
यवतमाळ (1) – 21 मार्च
कल्याण (1) – 21 मार्च
मुंबई (6) – 22 मार्च
पुणे (4) – 22 मार्च
मुंबई (14) – 23 मार्च
पुणे (1) – 23 मार्च
मुंबई (1) – 23 मार्च
कल्याण (1) – 23 मार्च
ठाणे (1) – 23 मार्च
सातारा (2) – 23 मार्च
सांगली (4) – 23 मार्च
पुणे (3) – 24 मार्च
अहमदनगर (1) – 24 मार्च
सांगली (5) – 25 मार्च
मुंबई (9) – 25 मार्च
ठाणे (1) – 25 मार्च
मुंबई (1) – 26 मार्च
ठाणे (1) – 26 मार्च
नागपूर (1) – 26 मार्च
सिंधुदुर्ग (1) – 26 मार्च
सांगली (3) – 26 मार्च
पुणे (1) – 26 मार्च
कोल्हापूर (1) – 26 मार्च
नागपूर (4) – 27 मार्च
गोंदिया (1) – 27 मार्च

सांगली (12) – 27 मार्च

एकूण – 147 कोरोनाबाधित रुग्ण

कोरोनामुळे आतापर्यंत भारतात कुठे किती मृत्यू?

कर्नाटक – 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 11 मार्च
दिल्ली – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू (1) – 13 मार्च
मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च
पंजाब – एका रुग्णाचा मृत्यू (1) – 19 मार्च
मुंबई – 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
पाटणा – 38 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 22 मार्च
गुजरात – 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च
मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)
पश्चिम बंगाल – 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू (1) – 23 मार्च
मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च
अन्य एकाचा मृत्यू (1) -25 मार्च
मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च
मुंबई – 63 वर्षीय महिलेचा कस्तुरबा रुग्णालयात  मृत्यू (1)– 26 मार्च
गुजरात – दोघांचा मृत्यू (2)– 26 मार्च

देशात मृत्यूचा आकडा : 20
महाराष्ट्रात मृत्यूचा आकडा : 05
देशात कोरानाबाधित रुग्ण : 727
राज्यात कोरोना बाधित रुग्ण : 136
जगात मृत्युचा आकडा : 24,089

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या 

विळखा वाढला, सांगलीत एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण 

सांगलीत एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, राज्यातील रुग्णांची संख्या 98 वर   

संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?