सांगलीत सैनिकांची बोट पलटी, एनडीआरएफच्या जवानांनी सर्वांना वाचवलं

| Updated on: Aug 09, 2019 | 9:53 PM

कोल्हापूर रोड 100 फुटी कॉर्नरवरही घटना (Sangli Boat Overturn) घडली. गंगानगरजवळून काही लोकांना रेस्क्यू केलं जात होतं. बोट पलटी होताच जवळून जात असलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी पलटी झालेल्या बोटीतील सैनिकांना मदत केली.

सांगलीत सैनिकांची बोट पलटी, एनडीआरएफच्या जवानांनी सर्वांना वाचवलं
Follow us on

सांगली : महापुरामध्ये बचावकार्य करत असताना सांगलीत सैनिकांची बोट (Sangli Boat Overturn) पलटी झाल्याची घटना घडली. यामध्ये 7 ते 8 सैनिक आणि काही लोकही होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यातील सर्व सैनिक आणि पूरग्रस्त नागरिकांना वाचवण्यात यश आलं. कोल्हापूर रोड 100 फुटी कॉर्नरवरही घटना (Sangli Boat Overturn) घडली. गंगानगरजवळून काही लोकांना रेस्क्यू केलं जात होतं. बोट पलटी होताच जवळून जात असलेल्या एनडीआरएफच्या जवानांनी पलटी झालेल्या बोटीतील सैनिकांना मदत केली.

सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं. कारण, नुकतीच एक बोल पलटी होऊ नऊ जणांचा मृत्यू झाला होता. 30 जणांना घेऊन चाललेली बोट झाडाची फांदी लागू पलटी झाली होती. पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे सैनिकांची बोट पलटी झाली. सांगलीत एनडीआरएफ आणि नौसेनेकडून बचावकार्य सुरु आहे. वायूसेना आणि आर्मीकडूनही बचावकार्यात मदत केली जात आहे.

पाहा व्हिडीओ :