सांगली : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची हत्या होऊन चार दिवस उलटले असताना आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याचा खून झाला (Sangli ncp leader manohar patil murder) आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती मनोहर पाटील यांचा खून झाला आहे.
मनोहर पाटील हे कवठे महाकाळ पंचायत समितीचे माजी सभापती आहे. हारोली येथील शेतात अज्ञात हल्लेखोरांनी मनोहर पाटील यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. हल्ला केल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या हल्ल्यात मनोहर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
सांगली जिल्ह्यातील खटावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील यांची 2 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती. पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करत प्राणघातक हल्ला केला. आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. दरम्यान त्यानतंर चार दिवसांनी मनोहर पाटील यांचा खून झाला (Sangli ncp leader manohar patil murder) आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आनंदराव पाटील यांची हत्या
आनंदराव पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आहेत. आनंद पाटील हे पलूस तालुक्यातील खटाव गावापासून काही अंतरावर ब्रह्मनाळ गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या त्यांच्या शेतामध्ये कामानिमित्त गेले होते. काम आटोपून काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या घराकडे परतत असताना, वाटेत दबा धरुन बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. पाटील यांना रक्तबंबाळ करुन हल्लेखोर पळून गेले. आनंदराव पाटील यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती.
या हल्ल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू (Sangli ncp leader manohar patil murder) झाला.
संबंधित बातम्या :
अजित पवारांच्या सचिवाच्या भावावर कोयत्याने वार, उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर पसार
अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची हत्या, सांगली पोलिसांची पाच पथकं शोधकार्यात