सांगली : आरोग्याची चौकशी करणाऱ्या परिचारिकेला ग्रामपंचायतीसमोर चाबकाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धनाजी घोंगडे आणि बाळू घोंगडे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Nurse beaten by two brothers)
सांगलीतील जत तालुक्यातील येळवी गावात सोनाबाई घोंगडे (50) या नावाच्या वृद्ध महिला राहतात. त्या नुकत्याच परगावी जाऊन आल्या होत्या. त्यामुळे त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात येणार होती. त्यामुळे आरोग्यसेविका यांना वरिष्ठांनी त्या कुठे राहतात, याची विचारपूस करुन ठेवण्यास सांगितले.
त्याची माहिती घेण्यासाठी त्यांनी गावातील एका व्यक्तीकडून सोनाबाई घोंगडेचा पत्ता विचारला. त्यानंतर शुक्रवारी आरोग्यसेविका त्यांच्या घरी गेल्या. मात्र त्यावेळी सोनाबाई घरी नव्हत्या. त्यामुळे आरोग्य सेविका आरोग्य उपकेंद्रात गेल्या. त्यांनी वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
मात्र दुपारी दोनच्या सुमारास धनाजी घोंगडे आणि बाळू घोंगडे हे आरोग्य केंद्रात आले. त्यांनी आरोग्य सेविका यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
आमच्या आईचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवा. तुम्ही स्वॅब घेण्यासाठी घरी येणार असल्याचे आमची बदनामी झाली, अशी दमदाटी त्यांनी आरोग्य सेविकेला केली.
त्यानंतर शिवीगाळ करून चाबकाने मारहाण केली. यावेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते. मारहाण केल्यानंतर ते दोघेही निघून गेले. त्यानंतर विभुते यांनी जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मारहाण करणाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. (Sangli Nurse beaten by two brothers)
संबंधित बातम्या :
चाकणजवळ 17 वर्षीय तरुणीची हत्या, झुडपात विवस्त्र मृतदेह आढळला, अत्याचाराचा संशय
आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक