सांगली : सांगली जिल्ह्यातील विटा येथील युवकाने अत्याधुनिक पद्धतीचे हेल्मेट कल्पकतेने (Sangli Theft Free Helmet) आणि मेहनतीने बनवले आहे. या हेल्मेटचा वापर अपघात रोखण्यासाठी आणि गाडीचा वेग कमी जास्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. विविध युक्त्या करत विट्यातील तरुणाने हे हेल्मेट संशोधन केले आहे. या हेल्मेटला आता परदेशातूनही मागणी येऊ लागली आहे (Sangli Theft Free Helmet).
भोजलींग कुंभार असं या तरुणाचं नाव आहे. तो सांगलीतील खानापूर तालुक्यात राहातो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आयटीचे शिक्षण पूर्ण केले. सहा वर्षांपूर्वी त्याच्या डोक्यावरुन वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर आईच्या कष्टाने आणि आजीच्या पेन्शनच्या सहाय्याने त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून तो लाईट फिटिंगचे काम करत आहे. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात या तरुणाने एका हेल्मेटचे संशोधन केले.
काही वर्षांपूर्वी भोजलींगच्या निकट वर्तीयाचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात त्याने बसल्या-बसल्या देशात होणारे अपघात कसे कमी होतील यावर तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्याने अत्याधुनिक हेल्मेट बनवण्याचे ठरवले आणि मेहनत करुन हे अत्याधुनिक हेल्मेट बनवले.
फारसा खर्च न करता त्याने टाकाऊ किंवा वापरात नसलेल्या वस्तूंपासून सोपी सुविधा करुन सुरक्षित आणि वापरायला सुलभ हेल्मेट तयार केले आहे. या हेल्मेट मध्ये रिसिव्हर आणि ट्रान्समिटर असे दोन प्रकारचे सेन्सर बनवले आहेत. तर चिपद्वारे आयसीला प्रोग्रॅमिंग बनवले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रणा विकसित करत हे हेल्मेट तयार केले आहे. त्यामुळे हेल्मेटमुळे गाडी चोरी होणार नाही, अशी यंत्रणा बसवली आहे.
तसेच, चोरीपासून बाईकचं संरक्षण होणार आहे. अपघातावेळी इमर्जन्सीसाठी ऑटोमेटिक कॉलची सुविधा, रात्री पार्किंगमधील गाडी शोधण्यासाठी वायरलेस हेडलाईट, सरंक्षणासाठी वायरलेस हॉर्न, इत्यादी सुविधा या हेल्मेटमध्ये उपलब्ध आहेत.
भोजलींग यांनी या हेल्मेटचं पेटेंटही मिळवले आहे. तर परदेशातून या हेल्मेटला खूप मागणी वाढली आहे. पण परिस्थिती नसल्याने प्रॉडक्शन करता येत नाही. भोजलींग याला हे हेल्मेट भारतात द्यायचे आहे. त्यासाठी सरकारने मदत करुन या हेल्मेटचा भारतात फायदा होईल(Sangli Theft Free Helmet).
लॉकडाऊनमुळे अपघातात मोठी घट, गेल्या 15 वर्षात सर्वात कमी नोंदhttps://t.co/4cclzLeQvj
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 28, 2020
Sangli Theft Free Helmet
संबंधित बातम्या :
टँकर आणि दुचाकीचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 3 जण जागीच ठार