नाशिक : राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक उपाययोजना (Sanitization at lasalgaon onion market) केल्या जात आहे. त्यानुसार, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजार आवाराच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. यासाठी लग्नामध्ये स्वागतासाठी मंडपाच्या वापरले जाणारे अत्तराचा फवारा करणाऱ्या मशीनचा वापर केला जात आहे. ही मशिन आता चक्क सॅनिटायझर फवारणी करत आहे. कोरोनाविरोधात सॅनिटायझर फवारणाऱ्या या मशीनचा अनोखा प्रयोग करणारी राज्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे
भारतासह जगभरात कोरोना विषाणूचा धूमाकुळ घातला (Sanitization at lasalgaon onion market) आहे. या विषाणूची लागण होऊन आजारी पडू नये या भीतीने वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला जात आहे.
जीवनावश्यक यादीत असलेल्या कांद्याचे लिलाव सुरु ठेवण्याचे आदेश राज्य सरकाने दिले आहेत. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समिती ओळखली जाते. या समितीतून कांदा बाजार आवारावर दररोज हजारो वाहनातून कांदा लिलावासाठी येतात. त्यामुळे याठिकाणी व्यापारी, कांदा उत्पादक शेतकरी, हमाल, मापारी आणि बाजार समितीचे कर्मचारी वर्ग या सर्वांची मोठी गर्दी असते.
त्यामुळे कोरोना विषाणूंची लागण कोणत्याही घटकाला होऊ नये यासाठी बाजार समितीच्या वतीने सॅनिटायझर फवारणी मशिनद्वारे सुरू केली आहे. या फवारणीसाठी चक्क लग्न कार्यामध्ये मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर वापरले जाणारे अत्तर फवारणी मशीन वापरण्यात आले.
या अत्तर फवारणी मशीनमधून लासलगावच्या बाजार समितीत सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. सध्या एका मशीनद्वारे प्रायोगिक तत्त्वावर याची चाचणी घेण्यात आली आहे. त्यानंतर लवकरच या मशिनची संख्या वाढवून माणसांसह येणारी-जाणारी वाहने सुद्धा निर्जंतुकीकरण केली जाणार आहे. यामुळे कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू राहण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाने (Sanitization at lasalgaon onion market) सांगितले.