मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Sanjay Dutt admitted in Lilavati hospital)
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे. दरम्यान जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना उद्या डिस्चार्जही देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.
Actor Sanjay Dutt (in file pic) admitted to Lilavati hospital in Mumbai after he complained of breathlessness. His COVID-19 report is negative but he is still there for some time just for medical observation. He is perfectly fine: Lilavati hospital, Mumbai, Maharashtra pic.twitter.com/YTWomFsFtX
— ANI (@ANI) August 8, 2020
Just wanted to assure everyone that I’m doing well. I’m currently under medical observation & my COVID-19 report is negative. With the help & care of the doctors, nurses & staff at Lilavati hospital, I should be home in a day or two. Thank you for your well wishes & blessings ?
— Sanjay Dutt (@duttsanjay) August 8, 2020
संजय दत्त हे लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबापासून लांब होते. त्यांची पत्नी मान्यता दत्त ही दोन्ही मुलांसह दुबईला होते. या दरम्यान त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
संजय दत्त यांचा पानीपत चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ते सड़क 2, शमशेरा, भुज, केजीएफ, पृथ्वीराज आणि तोरबाज या चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. मात्र कोरोनामुळे चित्रपटांच्या शूटींगला ब्रेक लावण्यात आला आहे.
दरम्यान नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली. तब्बल 29 दिवसांनंतर अभिषेक बच्चनला डिस्चार्ज देण्यात आला. त्यापूर्वी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्वजण कोरोनामुक्त झाले आहे. (Sanjay Dutt admitted in Lilavati hospital)
संबंधित बातम्या :
Abhishek Bachchan | वचन हे वचन असते, कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिषेक बच्चनचे ट्वीट