Photo : संजय राऊत सहकुटुंब शरद पवारांच्या घरी
VN |
Updated on: Jan 15, 2021 | 11:23 AM
शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले होते. (Sanjay Raut's family at Sharad Pawar's house)
1 / 5
महाविकासआघाडीचे सरकार अडचणीत सापडले असताना आता शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले.
2 / 5
संजय राऊत यांच्याबरोबर त्यांची पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. त्यामुळे सिल्व्हर ओकवरील संजय राऊतांच्या सहकुटुंब भेटीचे नेमके कारण काय आहे, याची चर्चा रंगली.
3 / 5
मात्र ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याचं स्पष्ट झालंय. संजय राऊत आपल्या मुलीच्या साखरपुड्याचं निमंत्रण देण्यासाठी सहकुटुंब पवारांच्या भेटीला गेले होते.
4 / 5
महाविकासआघाडीतील प्रत्येक नेत्याच्या भेटीगाठीतून कोणते ना कोणते अर्थ काढले जात आहेत. मात्र, संजय राऊत यांची ही सहकुटुंब भेट सर्वांसाठीच अनपेक्षित ठरली.
5 / 5
ही केवळ सदिच्छा भेट आहे की यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये कोणती राजकीय चर्चा होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.