अभिनय क्षेत्रात सक्रिय नसला तरी सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खान सोशल मीडियावर चर्चेत असतो.
हुबेहूब सैफची प्रतिकृती भासणाऱ्या इब्राहीमने नुकतेच दिवाळीचे निमित्तसाधून खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये त्याची बहीण, अभिनेत्री सारा अली खान आणि आई अमृता सिंह देखील सहभागी झाल्या होत्या.
‘दिवाळी तर संपली. आता कॅप्शन सुचत नाहीत’, असे म्हणत त्याने हे फोटो शेअर केले आहेत.
इब्राहीम आणि साराच्या चाहत्यांकडून या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
इब्राहीम आणि साराचे हे फोटो पाहून घायळ झालेले चाहते त्यांना चक्क लग्नाची मागणी घालत आहेत.