साताऱ्यातील ‘त्या’ रुग्णाचा ‘कोरोना’ अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकाऱ्यांनी मृत्यूचं कारण सांगितलं

| Updated on: Apr 06, 2020 | 2:07 PM

मुंबई शहरात रविवारी 103 नवीन ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ (Satara Corona Patient) आहे.

साताऱ्यातील त्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकाऱ्यांनी मृत्यूचं कारण सांगितलं
Follow us on

सातारा : साताऱ्यात कॅलिफोर्नियावरुन आलेल्या 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू (Satara Corona Patient) झाला आहे. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या व्यक्तीचा मृत्यू हा हृदयविकाराने झाला आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्यात (Satara Corona Patient) मृत्यू झालेल्या हा रुग्ण कॅलिफोर्नियावरुन परतला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याने गेल्या 14 दिवसांपासून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यानंतर फेर तपासणीत त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र आज सकाळी पहाटे अचानक त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान या रुग्णाचा मृत्यू हा हृदय विकाराने झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या रुग्णाचा 15 व्या दिवसाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. त्यामुळे हा रिपोर्ट आल्यानतंर त्याच्या मृत्यूची अधिकृत माहिती समोर येईल.

मुंबई शहरात रविवारी 103 नवीन ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची नोंद झाली. ही एका दिवसातील सर्वाधिक वाढ आहे. 2 एप्रिलपर्यंत शहरामध्ये 238 रुग्ण होते, तेव्हा रुग्णालयातील 310 खासगी बेडपैकी सुमारे 42% जागा भरल्या होत्या.

राज्यात कालच्या दिवसात (5 एप्रिल) 113 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 748 झाली आहे तर आतापर्यंत 56 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईतील ‘कोरोना’ग्रस्तांचा आकडा 458 वर पोहोचला आहे.

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

1. मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 17 मार्च
2. मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 22 मार्च
*मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)*
3. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 23 मार्च
4. मुंबई – एकाचा मृत्यू -25 मार्च
5. नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
6. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू– 26 मार्च
7. बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च
8. मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च
9. पुणे – 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
10. मुंबई – 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू – 30 मार्च
11. मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू – 31 मार्च
12. पालघर – 50 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
13. मुंबई – 51 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
14. मुंबई – 84 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
15. मुंबई – 73 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
16. मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू – 1 एप्रिल
17. मुंबई – 56 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 1 एप्रिल
18. जळगाव – एका रुग्णाचा मृत्यू – 2 एप्रिल
19. मुंबई – 61 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
20. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
21. मुंबई – 58 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
22. मुंबई – 63 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
23. पुणे – 50 वर्षीय महिलेचा मृत्यू – 2 एप्रिल
24. वसई – 68 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 2 एप्रिल
25. बदलापूर – एका रुग्णाचा मृत्यू – 3 एप्रिल
26. मुंबई – 65 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 3 एप्रिल
27. अमरावती – एका रुग्णाचा मृत्यू – 4 एप्रिल
28. मुंबई – 70 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
29. मुंबई – 53 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
30. मुंबई – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 4 एप्रिल
31. मुंबई – 47 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 4 एप्रिल
32. मुंब्रा – 57 वर्षीय पुरुषाचा मृत्यू -= 4 एप्रिल
33. पुणे – 60 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
34. पुणे – 48 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
35. पुणे – 69 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
36. औरंगाबाद – 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 5 एप्रिल
37. डोंबिवली – 67 वर्षीय महिलेचा मृत्यू – 5 एप्रिल
38. मुंबई- 80 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
39. मुंबई- 77 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
40. मुबंई- 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
41. मुंबई- 70 वर्षीय महिलेचा मृत्यू- 5 एप्रिल
42. मुंबई- 52 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
43. मुंबई- 60 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
44. मुंबई- 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल
45. मुंबई- 64 वर्षीय पुरुषाचा मृत्यू- 5 एप्रिल

ताजी आकडेवारी पाहा :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861