मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) एका सभेत बोलताना राज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State Satej Patil) यांच्या राज्यमंत्री पदाविषयी बोलताना म्हणतात की, वयाची 50 उलटली तरीही अजून सतेज पाटलांना काँग्रेसकडून राज्यमंत्रीच का ठेवले जाते? असा सवाल त्यांनी भर सभेत केला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पक्षाच्या राज्यमंत्री आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी राबवलेल्या नव्या नेतृत्वाचीही संकल्पना त्यांनी सांगितली होती. कोल्हापूर पोटनिवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांना बंटी पाटीलसाहेब आता कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे अशी भावना ते व्यक्त करत आहेत. आणि त्यात वावगं असं काहीच नाही.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा मंत्री सतेज पाटील चर्चेत आले आहेत, कारण काही दिवसापूर्वी देशातील झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे वारे असतानाही सतेज उर्फ बंटी यांनी कोल्हापुरातून विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध केली होती, तेही आपल्या स्वतःच्या नेतृत्वावर.
विधानसभेवर जे काँग्रेसचे जे 44 आमदार आहेत, त्यापैकी 4 आमदार हे कोल्हापुरातून निवडून आले आहेत, त्यापैकी चार पैकी चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले आणि पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली, त्यातही बंटी पाटलांनी आपले टेक्निक वापरुन पुन्हा एकदा काँग्रेसचाच उमेदवार म्हणजेच जयश्री जाधव यांना निवडून आणले आहे. तरीही काँग्रेसकडून जनाधार लाभलेल्या नेत्याला पक्षाकडून पाठबळ मिळत नसेल तर काँग्रेस पुन्हा वाढणार का हाच सवाल आता उपस्थित केला जात आहे.
देशात 2019 नंतर जोरदारपणे भाजपचे वारे वाहू लागले, त्या काळानंतरही सतेज पाटील यांनी काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन कोल्हापुरातून एक नाही दोन नाही तर काँग्रेसच्या तिकिटावर 4 आमदार निवडून आणले. तेही स्वतःच्या हिम्मतीवर. आमदार पी. एन. पाटील, आमदार राजू आवळे, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांना निवडून आणण्या पाठीमागे सतेज पाटील नावाचेच टेक्निक आहे. मात्र याकडे काँग्रेस पक्ष कधी लक्ष देणार हाही सवाल आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2019 नंतर जेवढ्या काही निवडणुका झाल्या आहेत, त्या एकाही निवडणुकीत सतेज पाटील यांनी विजय साजरा केला नाही असं झालं नाही. ज्या ज्या निवडणुकीत बंटी पाटलांनी आपलं टेक्निक वापरलं आहे, त्या त्या निवडणुकीत विजयाची पतका काँग्रेसच्या गळ्यात पडली आहे. गोकुळ दूध संघ असो, जिल्हा बँक असो किंवा विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून जाणं असो बंटी पाटलांनी एकहाती सत्ता सांभाळली आहे, आणि कोल्हापूर आणि परिसरात काँग्रेस बळकट करण्यासाठीच त्यांनी प्रयत्न केले आहेत. तरीही सतेज पाटील यांना काँग्रेसकडून फक्त राज्यमंत्री पदच बहाल करण्यात आले आहे.
राजकारणात 2014 नंतर देशात सगळीकडे भाजपमय वातावरण असताना, आणि राज्यात भाजप-युतीचं सरकार असतानाही मंत्री सतेज पाटील यांनी मात्र कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची युती करुन महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता स्थापन केली. बंटी पाटलांकडून काँग्रेसमध्ये बळकटी आणण्यासाठी त्यांनी कसूर सोडला नाही. विशेषतः 2014 नंतर देशात आणि राज्यात भाजप आणि मोदी लाट असतानाही त्यांनी एका पाठोपाठ एक यश मिळवले आहे, आणि काँग्रेस जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रात बळकट केले आहे. त्यामुळेच अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.
महाराष्ट्रातील विधानसभेवर जे 44 आमदार आहेत त्यातील 4 आमदार हे एका कोल्हापुरातून त्यांनी निवडून आणले आहेत. त्यात सतेज पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. गाव, तालुका आणि जिल्हा पातळीवर काँग्रेस बळकट करण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे असतील ते प्रयत्न बंटी पाटलांकडून कधीच सुटले नाहीत. म्हणूनच आज कोल्हापूर जिल्हा भाजपमुक्त आहे, तो भाजपमुक्त केला आहे तो काँग्रेसचे मंत्रा सतेज पाटील यांनीच.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीने सतेज पाटील यांचे नेतृत्व पुन्हा एकदा झळाळून निघाले आहे. 2019 मध्ये सतेज पाटील यांनीच काँग्रेसचे चार आमदार निवडून आणले आहेत. त्यामध्येच आता निवडून आलेल्या जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव यांचा समावेश होता. मात्र कोरोना काळात त्यांचे निधन झाले आणि आता पुन्हा एकदा पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीच्या लढतीत सतेज पाटील यांनी कोल्हापुरचा गड एकट्याच्या जीवावर राखला आहे. तरीही काँग्रेसकडून जनाधार लाभलेल्या नेत्याचा विचार केला जात नसेल, त्यांचे नेतृत्व फक्त कोल्हापूरतेच मर्यादित ठेवले जात असेल तर पक्षासाठी आणखी काय मिळवायला पाहिजे असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला तर त्यात वावगे ते काय असणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस सगळ्यात बळकट कुठे असेल तर ते म्हणजे कोल्हापुरात आहे. कारण सतेज पाटील एका एका कार्यकर्त्यासाठी नेहमीच लढत आले आहेत, आणि काँग्रेसचा हात जनसामान्यांच्या हातात देत आहेत. सतेज पाटील तरुण दिसतात त्याचा अर्थ असा नाही की त्यांची अजून चाळीशीही झाली नाही, पण बंटी पाटलांनी आता पन्नाशी गाठली आहे. त्यामुळे त्यांना कॅबिनेट कधी मिळणार आणि सतेज पाटीलसारख्या नेत्याला काँग्रेस ताकद कधी देणार असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.