नांदेड : राज्यातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप मतैक्य झालेले नाही. शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यासाठी आणखी वेळ लागेल. म्हणून शाळा इतक्यात सुरु होणार नाहीत, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (School Education Minister Varsha Gaikwad explains why schools wont reopen sooner)
“सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्यातच अनेक शाळांचा वापर हा विलगीकरणासाठी केला जात आहे. अनेक शिक्षकांना कोव्हिडच्या ड्युटीवर नेमण्यात आलं आहे. शाळा सुरु करण्यापूर्वी आम्हाला खूप तयारी करावी लागेल, त्यामुळे सरसकट शाळा सुरु करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल” असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्या नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.
केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष उघडण्याची मुभा दिली असली, तरी महाराष्ट्रात नोव्हेंबर महिना उजाडण्याची वाट पहावी लागणार आहे. संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिल्याने दिवाळीनंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी चार दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. कोरोनाच्या धास्तीने पाल्यांना प्रत्यक्ष शाळेत पाठवण्यास पालक राजी नसल्याने मोठा दिलासा मिळाला.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत चाचपणी करण्यासाठी शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात संस्थाचालक महामंडळाची बैठक घेतली होती. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता इतक्यात शाळा उघडणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका संस्थाचालकांनी ऑनलाईन बैठकीत घेतली.
बैठकीत काय ठरले?
कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही पसरत असल्याने 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठवण्यास पालकही राजी होणार नाहीत, निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीत सुरु होता कामा नयेत. गेल्या वर्षीचे वेतनेतर अनुदान परत गेल्याने सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी ते तातडीने देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
दिवाळी 13 ते 16 नोव्हेंबरदरम्यान असल्याने किमान आणखी दोन महिने तरी विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार नाही. मात्र ऑनलाईन शिक्षण सुरुच राहणार आहे. (School Education Minister Varsha Gaikwad explains why schools wont reopen sooner)
केंद्राची सशर्त मुभा
दरम्यान, केंद्र सरकारकडून इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेण्यासाठी शाळेत जाण्यास आरोग्य मंत्रालयाने मुभा दिली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या पालकांकडून लेखी स्वरुपात परवानगी घेणं आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना एकमेकांपासून कमीत कमी सहा फुटांचं अंतर ठेवावं लागणार आहे. तसेच मास्कची सक्ती, सतत हात धुणे, थुंकण्यास मनाई, आरोग्य सेतू अॅप अनिवार्य आहे. कंटेन्मेंट झोनमधील शाळा उघडण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगही सुरु राहणार असल्याचं केंद्राने स्पष्ट केलं आहे. शाळांना जास्तीत जास्त 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावण्याची परवानगी आहे. क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरलेल्या शाळा अधिक काळजीपूर्वक स्वच्छ करण्यास सांगितले आहे.
अंतिम वर्षांची परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन, पुणे विद्यापीठाकडून दोन पर्याय, अंध विद्यार्थी मात्र संभ्रमातhttps://t.co/wto3EQwHZN #Pune #finalyearexam
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2020
संबंधित बातम्या :
महाराष्ट्रात शाळा दिवाळीनंतरच, शालेय शिक्षण मंत्र्यांचा विद्यार्थी-पालकांना दिलासा
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची मुभा मिळणार, अटी काय?
(School Education Minister Varsha Gaikwad explains why schools wont reopen sooner)