नवी दिल्ली : लिबियामध्ये अपहरण झालेल्या 7 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात यश आले आहे. सप्टेंबर महिन्यात नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. आध्रं प्रदेश, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील नागरिकांचा यामध्ये समावेश होता. 14 सप्टेंबरला लिबियातील अश्शरीफ येथून नागरिकांचे अपहरण झाले होते. ( Seven kidnaped Indians rescued in Libya)
ट्युनेशियातील भारतीय राजदुतांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लिबियामध्ये भारतीय उच्चायुक्तांचं कार्यालय नाही. ट्युनेशियातील राजतदुतांकडून लिबियातील भारतीयांसंबधी कामकाज केले जाते. लिबियातील सरकारच्या मदतीने भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
विदेश मंत्रालयानं अपहरण झालेले नागरिक सुरक्षित असल्याची माहिती 9 ऑक्टोबरला दिली होती. अपहरणकर्त्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी भारतीय नागरिकांचे फोटो पाठवले होते. खंडणीसाठी भारतीयांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी भारतीयांसोबत कोणताही गैरव्यवहार केलेला नाही.
लिबियात यापूर्वी देखील भारतीयांचं अपहरण
लिबियात भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र, त्यावेळी अपहरण झालेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली होती. लिबियातील विमानतळ परिसरातून अनेकदा भारतीय नागरिकांचं अपहरण झालं आहे. त्रिपोली विमानतळ मार्गावरुन जात असताना 7 नागरिकांचं अपहरण करण्यात आलं होतं.
भारतीय नागरिकांच्या अपहरणाच्या घटना समोर आल्यानंतर 2015 मध्ये भारतीय नागरिकांना लिबियामध्ये न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. 2016 मध्ये भारतीय नागरिकांना लिबिया प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. ती बंदी सध्या देखील लागू आहे.
संबंधित बातम्या :
भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?
ब्लॉग : ‘दिव्याखाली अंधार’ असताना अमेरिकेचं भारताकडे बोट
( Seven kidnaped Indians rescued in Libya)