चंद्रपूर : चंद्रपुरात एका अडीच वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली (Sexual Harassment on girls in Chandrapur) आहे. ही घटना जिल्ह्यातील सावली तालुक्यातील पाथरी गावात घडली. या घटनेमुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपीला अटक केली असून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची अधिक चौकशी (Sexual Harassment on girls in Chandrapur) करत आहेत.
गावात घराशेजारी राहणाऱ्या एका 45 वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. काल (18 जुलै) संध्याकाळी ही मुलगी घरा बाहेर खेळायला गेली असता रडत घरी आली. मुलगी रडत घरी आल्याने आईने चौकशी केली असता तिला हा गंभीर प्रकार समजला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
त्यानंतर मुलीच्या आईने तातडीने आरोपी विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती संपूर्ण गावामध्ये होताच तीव्र पडसाद उमटले असून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सर्व पाथरीवासीय नागरिक करीत आहेत.
संबंधित बातम्या :
शेजाऱ्यांशी भांडणाचा जाब विचारल्याने राग, वडील आणि भावाची चाकूने हत्या
चोरट्यांनाही कोरोनाची धास्ती, पुण्यात मास्क लावून चोरी करणाऱ्या दोघांना अटक