एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगा: शरद पवार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. भारताच्या वायूसेनेनं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा नेमका किती, याची माहिती सरकारने द्यावी, असं शरद पवार म्हणाले. ते अकलूजमध्ये बोलत होते. शरद पवार नेमकं काय म्हणाले? “आम्ही सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा दिला. याप्रकारात राजकारण न आणण्याची भूमिका […]

एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगा: शरद पवार
Follow us on

सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय हवाई दलाच्या कारवाईवरुन मोदी सरकारला प्रश्न विचारला आहे. भारताच्या वायूसेनेनं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा नेमका किती, याची माहिती सरकारने द्यावी, असं शरद पवार म्हणाले. ते अकलूजमध्ये बोलत होते.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

“आम्ही सरकार आणि सैन्याला एकमताने पाठिंबा दिला. याप्रकारात राजकारण न आणण्याची भूमिका आम्ही घेतली, आम्ही त्याच्याशी आजही प्रामाणिक आहोत.

इथं आता बऱ्याच लोकांना सांगण्यात आलं की समोरच्या बाजूचे मारले गेले. आपल्या जवानांच्या शौर्याबद्दल आमच्या मनात शंका नाही. पण वाचनात असं आलं की अमेरिका आणि इंग्रजी जी वृत्तपत्र आहेत, ती असं म्हणतात की आकडा सांगा. त्यांनी शंका उपस्थित केली.

काल तीन लोकांची मी मुलाखत पाहिली, नेव्ही, एअरफोर्स आणि आर्मी. पण कुणीच आकडा सांगितला नाही. किती लोक मारले गेले हे सांगितलं नाही. त्यामुळे या शंका लोकांच्या मनात राहू नये म्हणून सरकारने लवकर त्याची माहिती जाहीर करावी. त्यांच्या नावासकट जे लोक मृत्यूमुखी पडले…

कारण जे लोक मृत्यूमुखी पडले त्याचा अर्थ त्यांची बॉडी आपल्याकडेच असणार ना? त्यामुळे ती व्यक्ती कोण, त्याचं नाव काय, त्याचा फोटो हा देऊन टाकावा, म्हणजे याबद्दलची शंका लोकांच्या मनातून जाईल.” 

VIDEO:

राज ठाकरेंबद्दल शरद पवार काय म्हणाले?

पाकिस्तानमध्ये राज ठाकरेंची वक्तव्य दाखवली जात आहेत, त्यामुळे भारतातील नेत्यांनी जपून वक्तव्य करायला हवी होती का? अशी विचारणा पवारांना करण्यात आली.

त्यावर शरद पवार म्हणाले, “आता ते चित्र हळूहळू पुढे येत आहे. त्यामुळे राज ठाकरे म्हणतात, त्याच्यात तथ्य आहे की नाही याची शंका यायला लागली. आज एकदम निष्कर्ष काढता येणार नाही. डोवालांची चौकशी करा वगैरे मी म्हणत नाही. त्यांनी आधीच (राज ठाकरे) सांगितलं होतं असं होईल. त्यांनी महिना-दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की असं होईल. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, हा पुलवामाचा जो प्रकार झाला याच्यात जे कोणी आहे, ज्यांनी हे सगळं घडवलं, ते काही बाहरेच्या देशातून आले नव्हते. आपल्यातलीच पोरं होती. आता आपल्याच व्हॅलीमधल्या मुल्यांच्यात संताप, राग असेल, तर तो कमी करण्यासाठी काय करता येईल, हे शोधलं पाहिजे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वायूसेनेनं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवरुन सरकारला प्रश्न विचारलाय. सरकारनं एअर स्ट्राईकमधील मृतांचा नेमका आकडा सांगावा, नाहीतर राज ठाकरे यांच्या बोलण्यात तथ्य असू शकतं असं मत पवार यांनी व्यक्त केलंय.

पुलवामा हल्ल्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले?

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे गुरुवारी 14 फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर 10 दिवसांनी 24 फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यातील 40 जवान शहीद झाले, हे जवान राजकीय बळी आहेत, असा गंभीर त्यांनी केला होता. तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या एका माणसाची कसून चौकशी झाली, तर सगळ्या गोष्टी बाहेर पडतील. हे नेमकं काय प्रकरण होतं आणि काय घडलंय, हे बाहेर येईल.”, असे म्हणत पुलवामा हल्ल्यावरुन राज ठाकरेंनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

संबंधित बातम्या 

युद्ध हवं की नको, राज ठाकरेंकडून मोदींना मोठा पर्याय  

बेपत्ता पायलटचा लवकरात लवकर शोध घ्या : राज ठाकरे  

पाकिस्तानचं पाणी अडवायला नदीत अमित शाह झोपणार का? : राज ठाकरे