पिंपरी-चिंचवड : कोरोना रुग्णांना समर्पित असलेल्या वायसीएम रुग्णालयात डॉ. आरती उदगीरकर यांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संवेदनशीलता दाखवत त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. शरद पवारांनी फोन करत त्यांना धीर दिला. (Sharad pawar call covid infected lady doctor)
पिंपरी चिंचवड मधील कोविड समर्पित वायसीएम रुग्णालयात डॉ. आरती उदगीरकर या गेल्या चार महिन्यांपासून रुग्णसेवा देत आहेत. मात्र नुकतंच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहे. डॉ. आरती यांना कोरोना झाल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबिय चिंताग्रस्त झाले.
ही बातमी शरद पवारांना कळल्यानंतर त्यांनी डॉ. आरती यांना फोन करत त्यांना धीर दिला. त्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे.
“माझे वायसीएमच्या डॉक्टरांसोबत बोलणं झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी लागेल. पुरेशा उपचारासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यासारखे आपले बरेच सहकारी हे उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. त्यानंतर 15 दिवसांनी ते कामालाही लागले. डॉ. आरती यांच्यासाठी दवाखान्यात उत्तम औषधे आणि इंजेक्शनची व्यवस्था सुध्दा केली आहे. त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही,” असे शरद पवार डॉ. आरती यांना म्हणाले.
“शरद पवार साहेबांचा अचानक फोन आला. साहेबांनी फोन करून धीर दिला. त्यावेळी काळजी करण्याचं काही कारण नाही, असे सांगितले. त्यासोबतच आपल्या मंत्र्याची उदाहरण देत आरतीदेखील ठीक होईल असा धीर कुटुंबियांना दिला. त्यामुळे साहेबांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर लक्ष आहे यांची मला जाणीव झाली. मी आणि माझ्या कुटुंबिय साहेबांचे धन्यवाद करतो,” अशी भावना डॉक्टर आरतीचे वडील नरसिंह उदगीरकर यांनी व्यक्त केली
राज्यात गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडा वाढतच चालला आहे. या कोरोना विरुद्धच्या लढाईत जे कोरोना योद्धे आहेत. ते देखील आता मोठ्याप्रमाणात कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरजेचं आहे. (Sharad pawar call covid infected lady doctor)
संबंधित बातम्या :
Pune Corona | पुणेकरांना दिलासा, कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 33 दिवसांवर, मृत्यूदरही घसरला