रायगड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (9 जून) आपल्या कोकण दौऱ्याला रायगडपासून सुरुवात केली आहे (Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad). यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतले. त्यांनी माणगाव आणि म्हसळ्यात वादळाने केलेल्या नुकसानीचा आढावा घेतला. म्हसळानंतर ते दिवे आगारकडे रवाना झाले. ते आज दिवसभर रायगड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत सुनिल तटकरे, आदिती तटकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर अनेक नेते आहेत.
शरद पवार यांनी म्हसळा येथे मदरसा आणि उपजिल्हा रुग्णालय येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जिल्हा परिषद कृषी सभापती बबन मनवे, पंचायत समिती सभापती उज्वला सावंत, उपसभापती भधुकर गायकर, कोळी समाज अध्यक्ष अनिल बसवत यांनी यावेळी शरद पवार यांच्यासमोर नुकसानीच्या व्यथा मांडल्या.
शरद पवार यांनी या दौऱ्यात निर्माणाधीन खडतर रस्त्यांवरुन प्रवास करत नुकसानीची पाहणी केली. प्रवासादरम्यान त्यांचा ताफा पडलेल्या वीजेच्या तारांवरुनही गेला. माणगाव येथे पहिला टप्पा केल्यावर शरद पवार यांचा ताफा माणगाव ते म्हसळा, दिवेआगार, श्रीवर्धन असा प्रवास करत माणगाव म्हसळा रोडवरील घोणसे घाटातून पुढे गेला. या रोडचं सध्या काँक्रेटिकरण सुरु आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्यातील प्रमुख घडामोडी:
संबंधित बातम्या :
Live Update : शरद पवार यांचा दिवेआगरमधील शेतकऱ्यांशी संवाद
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये, दोन दिवसाच्या कोकण दौऱ्यासाठी सज्ज, उद्यापासून दौरा
Sharad Pawar in Nisarga Cyclone affected Raigad