मुंबई : भारत चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाच्या माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी भारतीय उपखंडाला सर्व दिशांनी चीन वेढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. (Sharad Pawar Meet With former Air Force Chief and former Foreign Secretary)
गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी 31 ऑगस्टला चीनी लष्कराने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केले होते. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले, असे भारत सरकारने स्पष्ट केलं होतं.
In the wake of the recent Indo-China border dispute, I had invited Shri Bhushan Gokhale, former Air Marshal of Indian Air Force and Shri Vijay Gokhale, Former Foreign Secretary and an expert on Indo-China relations… pic.twitter.com/SS5L8RluLt
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 3, 2020
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भारताचे माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण उपस्थित होते
भारतीय उपखंडाला चीन सर्व दिशांनी वेढत आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.
I hinted at the need to keep a close watch on affairs of Sri Lanka and Nepal and also the Chinese interventions in general.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 3, 2020
त्याचबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये चीनचा वाढत्या हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारताची आर्थिक वाढ थांबवण्याचे चीनचे धोरण असल्याचे म्हणणं शरद पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : गलवान खोऱ्यातील चीनच्या कुरापतीनंतर भारताचं चोख उत्तर, दक्षिण चीन समुद्रात भारतीय युद्धनौका तैनात
यापूर्वी, 15 जून रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली होती. त्यात 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असून तणाव कायम आहे.
“एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनबरोबरचा तणाव 1962 नंतर सर्वात गंभीर स्थितीत आहे. 45 वर्षांनंतरही चीनशी झालेल्या संघर्षात लष्करी हानी झाली आहे. सीमेवर दोन्ही बाजूंनी अभूतपूर्व सैन्य तैनात आहे” असे गेल्या आठवड्यात भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले होते. (Sharad Pawar Meet With former Air Force Chief and former Foreign Secretary)
संबंधित बातम्या :
चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर
भारतात येण्याआधीच राफेलच्या कामगिरीची चर्चा, चीनसारख्या देशाला भीती का वाटते?