बारामती : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत. (Sharad Pawar on Solapur Tour to Guide on COVID19)
शरद पवार रविवारी सकाळी 8 वाजून 25 मिनिटांनी बारामतीतील ‘गोविंद बाग’मधील निवासस्थानाहून सोलापूरकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत.
शरद पवार हे सोलापूरमधील ‘कोरोना’च्या परिस्थितीचा आढावा घेऊन खबरदारी आणि उपाय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
सोलापूरमध्ये ‘कोरोना’ची स्थिती काय?
सोलापूरमध्ये संचारबंदीचा आजचा तिसरा दिवस असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सोलापूर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. एक लाख जणांची अँटीजन रॅपिड टेस्ट होणार आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!
सोलापूर जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत कोरोनाचे 4 हजार 941 रुग्ण आहेत. शहरात एकूण 3,557 तर ग्रामीण भागात 1,384 रुग्ण आहेत. सोलापूर शहरातील 2,476 रुग्णांनी तर ग्रामीण भागातील 460 जणांनी कोरोनावर मात केली.
सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 359 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. सोलापूर शहरातील 318 जणांचा, तर ग्रामीण भागातील 41 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला. (Sharad Pawar on Solapur Tour to Guide on COVID19)
हेही वाचा : धनंजय मुंडेंचे बारामतीत पवार कुटुंबासह बर्थडे सेलिब्रेशन
उत्तर सोलापूर तालुक्यातील 11 आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 7 रस्ते संचारबंदी काळात ग्रामीण पोलिसांकडून बंद करण्यात आले. तर विरोधानंतर सोलापूर महानगरपालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 19 July 2020 https://t.co/1pyF8knUIj
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2020