मुंबई : सतत वेगवेगळ्या वक्तव्यातून चर्चेत राहणारी राखी सावंत सध्या वेगळयाच मुद्दयावरुन चर्चेचा विषय बनली आहे. यावेळी राखीने सोशल मीडियावर आपल्या लग्नाची पत्रिका शेअर केली असून येत्या 31 डिसेंबरला, लॉस एंजेलिस येथे लग्न होणार आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर ही लग्नाची पत्रिका तिने शेअर केली आहे. ती दीपक कलाल सोबत लग्न करणार असल्याचं पत्रिकेतून स्पष्ट होत आहे.
बॉलीवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहे. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि अभिनेता रणवीर सिंहचे लग्न इटलीत पार पडले. तर आता अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निकच्या लग्नाचे कार्यक्रम सुरु झाले आहेत. याचदरम्यान कपील शर्मानेही आपल्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यानंतर आता राखीने शेअर केलेल्या लग्न पत्रिकेवरुन पुन्हा ती चर्चेत आली आहे.
कोण आहे दीपक कलाल
राखीने शेअर केलेल्या लग्न पत्रिकेनुसार ती दीपक कलाल सोबत लग्न करणार आहे. दीपक कलालनेही आपल्या इंस्टाग्रामवर लग्नाचे कार्ड शेअर केले आहे. दीपक कलाला सोशल मीडियावर प्रसिद्द आहे. दीपक सतत सोशल मीडियावर आपल्या हटके पोस्ट आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर त्याचा मोठ्या संख्येने चाहता वर्ग आहे. नुकतेच रिएलिटी शो इंडिया गॉट टॅलेंटमध्ये दिसला होता.
मागे राखी सावंत आणि तनुश्री दत्तामध्ये चांगलाच वाद चालू होता. राखी सलग मीटू चळवळीच्या माध्यमातून नाना पाटेकरचा बचाव करत होती. तर नुकतेच ती एका रेसलिंग रिंगमध्ये उतरली होती. जिथे तिला महिला रेसलरचा मार खावा लागला होता. यामुळे तिला रुग्णालयातही दाखल करावे लागले होते. आता अचानक लग्नाचे कार्ड राखीने शअर केल्यामुळे पुन्हा एकदा राखी चर्चेत आलेली आहे.