नवी दिल्ली : ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या एका व्हिडीओ जाहिरातीनंतर आंतरधर्मीय लग्नाच्या मुद्द्यावर जोरदार चर्चा होत आहे. तनिष्कच्या जाहिरातीत असंच एक लग्नाचं उदाहरण दाखवल्यानंतर त्यावर बहिष्काराची भाषा झाली आणि तनिष्कला ट्रोलही करण्यात आलं. त्यानंतर तनिष्कने ही जाहिरात मागे घेतली. मात्र, याच मुद्द्यावरुन अनेक दिग्गज आता प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. शशी थरुर यांनी याच मुद्द्याला हात घालत बहिष्कार घालण्याची धमकी देत ट्रोलिंग करणाऱ्यांना ‘सर्वसमावेशक भारताची’ आठवण करुन दिली आहे. यावेळी थरुर यांनी जारा फारूकी यांच्या आंतरधर्मीय लग्नाचं उदाहरण देत त्यांचं कौतुक केलं (Shashi Tharoor Zeeshan Ayyub Rasika Agashe Zara Parwal on tanishq ad controversy).
जारा फारूकी यांनी आपल्या आंतरधर्मीय लग्नाचा फोटो ट्विट करत धार्मिक द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली. जारा फारूकी यांनी म्हटलं, “हा फोटो तनिष्कवर बहिष्कार टाकणाऱ्यांसाठी आणि वेगळ्या धर्मातील दोन व्यक्तींच्या लग्नावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांसाठी आहे. माझं पहिलं नाव जारा फारूकी आहे. माझं लग्न 2016 मध्ये निखिल परवाल यांच्याशी झालं आणि हे आमचे लग्नाचे फोटो.”
This is for @TanishqJewelry and #bigots who called for #BoycottTanishq and have questioned “what if” religions were changed.
So here goes, my maiden name is Zara Farooqui and I am married to Nikhil Parwal @NikZar05 since 2016. And these are our wedding pics. #TanishqAd pic.twitter.com/PV2dQScFPJ— Zara Raj Parwal (@ZParwal) October 14, 2020
“आम्ही हिंदू रुढी-परंपरेनुसार मोठ्या उत्साहात भारतीय लग्न केलं. या लग्नात 4 दिवस कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईकांसह दूर दूरवरुन आलेल्या लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला. माझ्या पतीच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मला स्वीकारत खूप प्रेम दिलं. तरीही काही बिनडोकांसाठी हे अकल्पनीय आहे. मात्र, जाती आणि धर्मापलिकडील भारतात असंच होतं. वेगवेगळे कुटुंब एकमेकांच्या परंपरांचं खुलेपणाने स्वागत आणि सन्मान करतात,” असंही जारा फारुकी यांनी म्हटलं.
जारा फारूकी यांनी शेवटी म्हटलं, “मला आशा आहे की सर्व द्वेष करणाऱ्यांना आपल्या आयुष्यात असं विनाअट प्रेम आणि सन्मान मिळो.”
“गंगा-जमुनी परंपरेचं जीवंत उदाहरण”
Pleased to learn That @nikZar05 @ZParwal are fellows of @AIPCMaha. Zara is the Secretary of Pune North Chapter and Nikhil is in the finance fund raising team . They represent the best of #InclusiveIndia! @ProfCong https://t.co/NOvQMIbJfT
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) October 15, 2020
काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी जारा यांचं हे ट्विट रिट्विट करुन त्यावर प्रतिक्रिया दिल्यानंतर हे ट्विट चांगलंच व्हायरलं झालं. शशी थरुर म्हणाले, “जारा फारूकी आणि निखिल परवाल ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे सदस्य असल्याचं समजल्यावर खूप छान वाटलं. जारा उत्तर पुण्याच्या सचिव आहेत आणि निखिल फायनान्स फंडच्या टीममध्ये आहे. हे दोघं भारताच्या ‘गंगा जमुनी परंपरेचं’ जीवंत उदाहरण आहेत.”
लव्ह जिहादच्या नावाने गळा काढण्याआधी स्पेशल मॅरेज अॅक्ट समजून घेऊ
बॉलिवूड अभिनेता झीशान आयुब याची पत्नी आणि नाट्यकलाकार-दिग्दर्शक रसिका आगाशे हिनेही आपल्या आंतरधर्मीय लग्नाचं उदाहरण देत डोहाळ्याच्या कार्यक्रमाचा एक फोटो ट्विट केला. ती म्हणाली, “हा माझ्या डोहाळ्याच्या कार्यक्रमाचा फोटो, म्हटलं शेअर करावा. लव्ह जिहादच्या नावाने गळा काढण्याआधी कृपा करुन विशेष विवाह कायदा (स्पेशल मॅरेज अॅक्ट) समजून घ्या.”
Meri godbharai.. socha share kar dun.. and before crying out love jihad, lets learn about special marriage act.. pic.twitter.com/BUykrCriaC
— rasika agashe (@rasikaagashe) October 14, 2020
रसिका शिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान यांची पत्नी मिनी माथुर (Mini Mathur)यांनी देखील एक उदाहरण सादर केलंय. त्यांनी लिहिलं आहे, “यापेक्षा कितीतरी अधिक प्रेम मला माझ्या आंतरधर्मीय लग्नात मिळालं आहे.”
हेही वाचा :
तनिष्क ज्वेलर्सच्या जाहिरातीवरुन वाद, सोशल मीडिया ट्रोलिंगनंतर जाहिरात हटवली
Tanishq Advertisement : ‘तनिष्क’वर कंगना भडकली, जाहिरातीतून लव्ह-जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप
संबंधित व्हिडीओ :
Shashi Tharoor Zeeshan Ayyub Rasika Agashe Zara Parwal on tanishq ad controversy