नवी दिल्ली : माजी खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काही मजेदार ट्विट करत चीन आणि केंद्र सरकारच्या धोरणावर निशाणा साधला आहे (Shatrughan Sinha on China and Fuel price). चीनबाबत त्यांनी एक विनोद ट्विट केला. यात चीनमध्ये क्रिकेट का खेळला जात नाही? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. त्यातच पुढे उत्तरात त्यांनी चीनमधील लोक बॅट (वटवाघूळ) खातात आणि त्यांनी आपली बॉन्ड्री (मर्यादा) देखील माहिती नाही असं म्हटलं आहे.
Just for a good laugh?:
Q. Why don’t the Chinese play cricket?
A. Becoz they eat up their bats and don’t know their boundaries!— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 30, 2020
शत्रुघ्न सिन्हा यांनी देशातील वाढत्या इंधन दरावरुन केंद्र सरकारवरला टोले लगावले. पेट्रोल-डीझेलच्या (Petrol-Diesel) वाढत्या किमतीच्या मुद्द्यावर काँग्रेससह विरोधीपक्ष संपूर्ण देशात आंदोलनं आणि निषेध मोर्चे होत आहेत. हाच धागा पकडून शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करत केंद्राच्या धोरणावर निशाणा साधला.
एक बार चंबल के डाकुओं ने एक कवि सम्मेलन आयोजित किया…
डाकुओं ने खूब मस्ती की और कवियों को सोने के गहने और ढेर सारे पैसे देकर विदा किया।
थोड़ा आगे जाकर कवियों को डाकुओं ने लूट लिया।
लुटेरों ने कहा: उपहार देना हमारा कर्तव्य है और लूटना हमारा व्यवसाय है।
नोट: इस पोस्ट का
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 30, 2020
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, “एकदा चंबळच्या डाखूंनी एक कवि संमेलन भरवलं. यात या डाखूंनी भरपूर मजा-मस्ती केली आणि या कवींना सोन्याचे दागिणे आणि खूप पैसेही दिले. कवी दागिणे आणि पैसे घेऊन थोडे पुढे गेल्यावर या डाखूंनी त्यांना लुटले. तेव्हा त्यांनी म्हटलं, भेट देणं हे आमचं कर्तव्य होतं आणि लूट करणं हा आमचा व्यवसाय आहे.”
पेट्रोल-डीजल के दाम में बढ़ोतरी और लाखों रुपए के राहत पैकेज से कोई लेना-देना नहीं है।#आत्मनिर्भर_भारत
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 30, 2020
या ट्विटच्या शेवटी त्यांनी संबंधित ट्विटचा पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ आणि लाखो रुपयांचे मदत पॅकेज याच्याशी काहीही संबंध नसल्याची उपरोधात्मक टीपही लिहिली. यातून त्यांनी केंद्र सरकार एका हाताने पैसे देण्याची घोषणा करत असलं तरी दुसरीकडे इंधनाची दरवाढ करुन तेच पैसे पुन्हा वसूल करत असल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला. तसेच आपल्या ट्विटच्या शेवटी त्यांनी आत्मनिर्भर भारतचा हॅशटॅग वापरत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या घोषणेलाही लक्ष्य केलं.
Sharing a very important & informative video clip by a highly respected, intellectual/journalist, Punya Prasun Bajpai @ppbajpai. His work is loved & admired by one & all,as he does a complete fact check with his report /findings. I am not stating any comments from my side,
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 30, 2020
शत्रुघ्न सिन्ह यांनी यानंतर आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध पत्रकार आणि संपादक पुण्यप्रसून बाजपेयी यांचा इंधन दरवाढीच्या निर्णयावर भाष्य केलेला व्हिडीओ देखील शेअर केला. यात त्यांनी म्हटलं, “मी अत्यंत बुद्धीवान आणि आदरणीय पत्रकार पुण्यप्रसून बाजपेयी यांचा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडीओ शेअर करत आहे. सर्वांकडूनच त्यांच्या कामावर प्रेम केलं जातं. ते नेहमीच त्यांच्या मांडणीपूर्वी तथ्यांची तपासणी करतात. मी त्यांच्या व्हिडीओवर काहीही प्रतिक्रिया देणार नाही.”
Hon’ble PM @narendramodi Sir,you are the friend of the nation,our PM too, we hold you in high esteem & the whole country stands by you in this hour.
However, for some enlightenment, entertainment, & some laughter, which I’m sure you also need & deserve. I’m sharing an old video pic.twitter.com/TDmNHV7M9a— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) June 30, 2020
आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयासह अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना टॅग केले आहे. यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत थेट पंतप्रधान मोदींनी टॅग केलं आहे. या व्हिडीओत त्यांनी इंधन दरवाढ आणि रुपयाचं अवमुल्यन यावर मोदींच्या जुन्या प्रतिक्रिया आणि आजची स्थिती यावरील विरोधाभास दाखवून दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं, “पंतप्रधान मोदी तुम्ही देशाचे मित्र आहात आणि पंतप्रधान देखील आहात. आम्ही तुमचा खूप आदर करतो आणि संपूर्ण देश तुमच्यासोबत उभा आहे. तरीही काहीसं मनोरंजन, हास्य तुम्हाला आवश्यक आहे. म्हणूनच एक जुना व्हिडीओ शेअर करत आहे.”
हेही वाचा :
PM Modi | 13 हजारांचा दंड, नरेंद्र मोदींनी भाषणात उल्लेख केलेले पंतप्रधान कोणत्या देशाचे?
PM Garib Kalyan Ann Yojana | 80 कोटी नागरिकांना आणखी 5 महिने मोफत धान्य : पंतप्रधान मोदी
Shatrughan Sinha on China and Fuel price