ज्यांचं लग्न झालं नाही तेही तुमचे बाप… संजय राऊत यांच्यावर कुणी केला हल्लाबोल ?

| Updated on: Feb 22, 2024 | 1:24 PM

शिंदे आणि फडणवीस यांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, आम्हाला मुंबईची जागा विकण्याची गरज नाही, संजय राऊत हा वेडा माणूस … त्याला काम धंदे नाहीत अशा शब्दात शिंदे गटाच्या नेत्याने संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले.

ज्यांचं लग्न झालं नाही तेही तुमचे बाप... संजय राऊत यांच्यावर कुणी केला हल्लाबोल ?
Follow us on

मुंबई | 22 फेब्रुवारी 2024 : शिंदे आणि फडणवीस यांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, आम्हाला मुंबईची जागा विकण्याची गरज नाही, संजय राऊत हा वेडा माणूस … त्याला काम धंदे नाहीत. बाळासाहेबच आमचे बाप , ते तुमचे नाहीत… तुमचे बाप आत्ता बाळासाहेब नाहीत तर शरद पवार, राहूल गांधी, ज्यांचं लग्नही झालं नाही ते तुमचे बाप आहेत… ‘   अशा शब्दात शिंदे गटाच्या नेत्याने संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकारवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. मात्र त्यांच्या या विधानाचा शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी चांगलाच समाचार घेतला. ‘  आमचे बाप काढू नका… तुमचे आणखी तिसरे बापही होऊ शकतात… संजय राऊत नीच प्रवृत्तीचा माणूस आहे  ‘ अशा शब्दात शिरसाट यांनी राऊत यांना खडसावलं.

गुरूवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महायुती आणि भाजपावर तसेच नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. नरेंद्र मोदीच्या खिशाला जे पेन आहे ते 25 लाखांचं आहे. मोदींच्या हातातील घड्याळाची किंमत काढा, त्यांचा सूट दहा ते पंधरा लाखाचा आहे. मोदींचं विमान खास, वीस हजार कोटींचं विमान आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश आहेत. एकही गरीब किंवा चहा विकणारा नाही हे ढोंग भाजपने बंद केले पाहिजे अशा शब्दांत राऊत यांनी टीकास्त्र सोडले होते.

काय म्हणाले संजय शिरसाट ?

मात्र त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी चांगलेच संतापले असून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी त्यांचा समाचार घेतला. शिंदे आणि फडणवीस यांचं सर्वसामान्यांचं सरकार आहे, आम्हाला मुंबईची जागा विकण्याची गरज नाही. संजय राऊत हा वेडा माणूस आहे, त्याला काही कामधंदे नाहीत. तुम्ही आम्हाला गँग बोला, काहीही बोला पण ताकद आमची आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत , काम करत आहोत, सर्व सामान्यांसाठी झटत आहोततु. तुम्ही काय करता ? असा सवाल शिरसाट यांनी राऊत यांना केला.

एवढंच नव्हे तर ‘ बाळासाहेबच आमचे बाप , ते तुमचे नाहीत. तुमचे बाप आत्ता बाळासाहेब नाहीत तर शरद पवार, राहूल गांधी, ज्यांचं लग्नही झालं नाही ते तुमचे बाप आहेत. आमचे बाप काढू नका… तुमचे आणखी तिसरे बापही होऊ शकतात… संजय राऊत नीच प्रवृत्तीचा माणूस आहे ‘ अशा शब्दांत सुनावलं. तुम्ही सत्तेत येता तेव्हा काय करता ? घोटाळे करता अशी टीका त्यांनी केली.

नालायकांनो लाज बाळगा

राऊत यांनी मोदींच्या पेनावरून टीका केली होती, त्यालाही शिरसाट यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. तुम्ही मोदींचं पेन पाहता, आमची घड्याळं पाहता, आता आमच्या अंडरपँटही पाहा, ती पण आम्ही महागडीच घालतो, तुमच्या सारखी फाटकी घालत नाही ! नालायकांनो लाज बाळगा , नितीमत्ता सोडून राजकारण करू नका असं त्यांनी सुनावलं.

यावेळी त्यांनी रोहित पवारांवरही निशाणा साधला. रोहित पवार यांना आत्ता नेता व्हायचंय, आधी तटकरेच एनसीपीचा किल्ला लढवत होते ना ? तेव्हा आरोप का नाही केले ? एक मॅव मॅव आणि दुसरा हा , त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये असे ते म्हणाले.